Pune PMC Canteen | महापालिका कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार हक्काचे उपहार गृह! | पीएमसी एम्प्लॉईज युनियन च्या मागणीला यश
| सेवकांसाठी असणाऱ्या उपहारगृहास आयुक्तांची मान्यता
PMC Employees Union – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Employees) लवकरच हक्काचं उपहार गृह मिळणार आहे. नवीन इमारतीत तळ मजल्यावर असणाऱ्या या अत्याधुनिक सुविधायुक्त उपहारगृह उभारणीस नुकतीच महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी मान्यता दिली आहे. याची भवन विभागाकडून टेंडर प्रक्रिया सुरू आहे. (Pune Municipal Corporation Canteen)
हे उपहारगृह ४ थ्या मजल्यावर नियोजित होते. परंतु दिव्यांग नागरिक, जेष्ठ नागरिक तसेच सर्व सेवकाना सहजपणे ये -जा करता येईल यासाठी युनियन ने मागणी केली त्या नुसार तळ मजल्याची पाहणी करुन जागा निवडण्यात आली आहे. उपहारगृह हे सेवकांसाठी असल्याने ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालवावे, ही विनंती युनियन ने केली आहे. उपहारगृह सेवकांसाठी असल्याने उपहार गृहसाठी कोणतेही भाडे आकारण्यात येऊ नये. अशी देखील मागणी आता युनियन ने केली आहे. (Pune PMC News)
आता नवीन इमारतीत तळमजल्यावर उपहार गृह मंजूर केल्याबद्दल पी एम सी एम्प्लॉइज युनियन ने आयुक्त राजेंद्र भोसले, अति आयुक्त पृथ्वीराज , उपायुक्त महेश पाटील , मुख्य अभियंता युवराज देशमुख , कनिष्ठ अभियंता वाघे यांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया अध्यक्ष बजरंग पोखरकर यांनी दिली. कारण उपहार गृह व्हावे ही सर्व खूप दिवसापासून सेवकांची मागणी होती. त्यासाठी युनियन ने आंदोलन देखील केले होते. याचीच दखल घेऊन आयुक्त यांनी तात्काळ संबंधित विभागला प्रस्ताव ठेवण्यास आदेश दिले. त्यास आयुक्त यांनी मान्यता दिली आहे.
—
आयुक्त यांना येऊन थोडाच कालावधी झाला असून या कालावधीत साहेबानी सेवक हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यामध्ये ५०% सुधारीत पेन्शन, पदोन्नती, बदल्या, उपहारगृह, यांचा समावेश आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्या पूर्वी ९५ उपअधीक्षक, १४० वरिष्ठ लिपिक यांची डीपीसी घेऊन रिक्त जागी सेवकांना पदोन्नती देण्यात यावी. तसेच कोणताही विलंब न लावता लवकरात लवकर उपहारगृह चालू करावे, सर्व सेवकांच्या वतीने विनंती.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष
पीएमसी एम्प्लॉईज युनियन पुणे महानगरपालिका
COMMENTS