Pune Okayama Friendship | पुणे – ओकायामा मैत्रीची 20 वर्ष | कलाग्राम मध्ये कार्यक्रमाचे आयोजन
PMC P L Deshpande Garden – (The Karbhari News Service) – आज पुणे – ओकायामा मैत्रीस 20 वर्ष पूर्ण झाल्यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर यांनी पु. ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड येथील पुणे ओकायामा मैत्री उद्यानास भेट दिली. (Kalagram Okayama Friendship Garden Pune)

यावेळी कोजी याकी (कॉन्सलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई) व या संस्थेचे प्रतिनिधी तसेच अशोक घोरपडे सह महापालिका आयुक्त, माधव जगताप (उपायुक्त), जयंत भोसेकर (उपायुक्त), श्रीमती आशा राऊत (उपायुक्त), श्रीमती प्रज्ञा पोद्दार, (सहाय्यक महापालिका आयुक्त) व उद्यान विभागाकडील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कलाग्राम येथे “कोणीचीवा” २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS