Pune News | कै. डॉ. विकास आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

HomePune

Pune News | कै. डॉ. विकास आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

Ganesh Kumar Mule Jul 16, 2025 8:03 PM

District Collector | Pune | जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा
PMC Vidyaniketan School Katraj | पुणे महापालिकेच्या कात्रज मधील विद्यानिकेतन मराठी शाळेला २१ लाखांचे बक्षीस! 
Blood Donation Camp | दाभोलकरांच्या बलिदान दिनानिमित्त ६२ जणांचे रक्तदान | महा. अंनिसच्या शिवाजीनगर पुणे शाखेचा उपक्रम

Pune News | कै. डॉ. विकास आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त श्रद्धांजली व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

 

The Karbhari News Service – शिक्षण, सामाजिक न्याय व मानवी मूल्यांची अस्सल जाण असलेले कै. डॉ. विकास मारुतराव आबनावे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त दिनांक १६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या प्रांगणात एक भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास दादा पवार (अध्यक्ष, डॉ. विकास आबनावे फाउंडेशन) होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मोहनदादा जोशी (अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ) उपस्थित होते.
तसेच ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, माजी नगरसेवक आयाज पठाण, माजी नगरसेविका स्नेहल पाडाळे, चेतन अग्रवाल (अध्यक्ष, इंटक), सुरेश कांबळे (सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस), माजी नगरसेवक सुनील मलके, माजी पीएमटी चेअरमन चंद्रशेखर कपोते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सूत्रसंचालन श्री. अशोक चव्हाण, प्रास्ताविक जाधव जयश्री व आभार प्रदर्शन कल्याणी साळुंखे मालुसरे यांनी केले.
मंडळाचे सचिव प्रसाद आबनावे, खजिनदार प्रथमेश आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे, तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उल्हास दादा पवार यांनी आपल्या भाषणात “डॉ. आबनावे यांनी समाजासाठी जपलेली मूल्ये, संस्थेची वाटचाल आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य आजच्या काळात अधिक महत्त्वाचे ठरते,” असे सांगितले.
मोहनदादा जोशी यांनीही “त्यांच्यासारख्या व्यक्तीचे जाणे ही केवळ संस्थेची नाही तर समाजाचीही हानी आहे,” असे नमूद केले.

डॉ. विकास आबनावे फाउंडेशन आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून दिवसभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले:

अन्नदान कार्यक्रम:

▪ मातोश्री वृद्धाश्रम, निवारा वृद्धाश्रम (नवी पेठ) व विद्या विकास वस्तीगृह येथे अन्नदानाचे आयोजन करण्यात आले.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी साहित्य वाटप – नेशनल असोसिएशन, पुणे:
▪ दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
▪ यावेळी प्रमुख पाहुणे श्री. हरिश्चंद्र गायकवाड (माजी अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ) यांनी संस्थेच्या विस्ताराची व डॉ. आबनावे यांच्या कार्याची सखोल माहिती दिली.
▪ राहुल देशमुख आणि त्यांची पत्नी सुचिता देशमुख यांनी सांगितले की, “या मदतीतून दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक आधार नाही, तर जीवन जगण्याची नवी दृष्टी मिळते.”
वही व स्टेशनरी वाटप:
▪ पुणे शहरातील विविध शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिष्यवृत्ती स्वरूपात परीक्षा शुल्क भरपाई:
▪ अशोक विद्यालय, महर्षी वाल्मिकी विद्यालय व जडबाई दगड विद्यालय यांसारख्या शाळांतील गुणवंत पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क डॉ. विकास आबनावे फाउंडेशनतर्फे भरले गेले.

पाच वर्षांची मूल्यनिष्ठ वाटचाल

गेल्या पाच वर्षांपासून डॉ. विकास आबनावे फाउंडेशन शिक्षण, सामाजिक न्याय, वंचितांच्या उन्नतीसाठी सातत्याने कार्यरत आहे.
“Rebuilding Lives for Better World” या ध्येयवाक्याला अनुसरून ही संस्था दिव्यांग, वृद्ध, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, आरोग्य सहाय्य, मानसिक आधार आणि प्रेरणा देणारे कार्य करत आहे.

हा कार्यक्रम आणि उपक्रम हे कै. डॉ. विकास आबनावे यांच्या स्मृतीला वाहिलेली कृतज्ञतेची सुसंस्कारित आणि सर्जनशील श्रद्धांजली ठरली.

———-

” डॉ. विकास आबनावे यांचे समाजाप्रती असलेले अमूल्य प्रेम, मूल्यनिष्ठ अस्मिता आणि परिवर्तनवादी विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल.”

प्रथमेश आबनावे, खजिनदार व संचालक, महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: