Pune News | मातीच्या ढिगार्याखाली दबलेल्या तिघांचे वाचवले प्राण | पुणे आणि पीएमआरडीएच्या पथकाचे बचाव कार्य
| एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
PMRDA Fire Brigade – (The Karbhari News Service) – नांदेड सिटी शेजारी पुणे महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या पाईप लाईनच्या मातीच्या ढगाराखाली दबलेल्या ४ पैकी ३ कामगारांचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभाग आणि पीडीआरएफच्या पथकाला यश आले. संबंधित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु या घटनेत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.४) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली. (PMC Fire Brigade)
गेल्या काही दिवसापासून नांदेड सिटी शेजारी जायका प्रोजेक्ट अंतर्गत नदी सुधार योजनेचे सुरू आहे. यासाठी संबंधित भागात पाईपलाईन टाकण्यासाठी मोठी चारी खोदण्याचे काम सुरू होते. पण दुर्दैवाने या चारित ४ कामगार मातीच्या ढिगार्याखाली दबल्याची घटना घडली. यासंबंधी सायंकाळी सहा वाजता पीएमआरडीएच्या पथकाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने अवघ्या पाच ते सात मिनिटात घटनास्थळ गाठत मदत कार्यास सुरुवात केली. त्यामुळे चार जणांपैकी तिघांना वाचवण्यात पीएमआरडीएच्या अग्निशमन विभाग व पीडीआरएफच्या पथकाला यश आले. यातील एका कामगाराचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला.
मदत कार्य तातडीने मिळाल्यामुळे चार कामगारांपैकी तिघांचा जीव वाचवण्यात पीएमआरडीएच्या पथकाला यश आले. संबंधित कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या पथकात अग्निशमन व पीडीआरएफच्या ३० जवानांनी शर्तीचे प्रयत्न केले. पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागासह पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन जवान आणि पीडीआरएफ जवान यांनी रेस्क्यू ऑपरेशन केले.

COMMENTS