Pune News | सहकारी बँका, पतसंस्थांतील ठेवीदारांना १५ लाखाच संरक्षण मिळावे | एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाआरती

एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज सोमवार रोजी दुपारी बारा वाजता श्री गणरायाची महाआरती करण्यात आली .

HomeBreaking News

Pune News | सहकारी बँका, पतसंस्थांतील ठेवीदारांना १५ लाखाच संरक्षण मिळावे | एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने महाआरती

Ganesh Kumar Mule Mar 31, 2025 4:56 PM

Iftar Party | इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा ; माजी उपमहापौर डाॅ. सिद्धार्थ धेंडे यांचा पुढाकार
PMRDA Draft DP | पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा | उपमुख्यमंत्री अजित पवार
Pune Metro | पुणे मेट्रोचे ई-तिकीट आता व्हॉट्सअँप वर उपलब्ध

Pune News | सहकारी बँका, पतसंस्थांतील ठेवीदारांना १५ लाखाच संरक्षण मिळावे – माजी आमदार मोहन जोशी

 

Coperative Banks Deposit – (The Karbhari News Service) – सहकारी बँका आणि पतसंस्थामधील ठेवीदारांना १५ लाखापर्यंतच्या रकमेचे संरक्षण मिळावे यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress) यांनी केली आहे.

31/03/2025 पर्यंत बुडालेल्या सहकारी बँका आणि पतसंस्थेतील ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळावेत या मागणीकरिता एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आज सोमवार रोजी दुपारी बारा वाजता श्री गणरायाची महाआरती करण्यात आली .

गेल्या काही वर्षापासून देशातील 40 बँका बुडत आहे तर महाराष्ट्रात 2008 पतसंस्था बुडाल्या आहेत यामध्ये देशातील कष्टकरी जनतेचे जवळपास 50 हजार कोटीच्या आसपास रक्कम अडकून आहे. आज पर्यंत बँकेतील खातेदारांना पाच लाखापर्यंत असलेली रक्कम मिळाली आहे तर पाच लाखांवरील असलेली रक्कम व पतसंस्थेमध्ये अडकलेल्या कष्टकरी नागरिकांच्या रकमेतील एकही रुपया आज पर्यंत मिळाला नाही तरी ज्या कष्टकरी नागरिकांचे पाच लाखापुढील रक्कम ही बँकेमध्ये अडकून आहे तसेच पतसंस्थेमध्ये अडकून असलेली रक्कम कष्टकरी जनतेला लवकरात लवकर मिळावी ही रक्कम देण्यास बँक व पतसंस्था सक्षम नसतील तर बँकेतील व पतसंस्थेतील संचालकांची मिळकत तात्काळ जप्त करून तिचा लिलाव करून यातून आलेली रक्कम तात्काळ कष्टकरी खातेदारांना मिळावी अशी प्रार्थना उपस्थित असलेल्या सर्वांनी श्री गणराया चरणी मागणी केली.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले, महाराष्ट्राचे नेते व माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सहकारी बँका बळकट करण्यासाठी सतत प्रयत्न केले पण केंद्र सरकारने नवीन निर्माण केलेले सहकार खाते व या खात्याचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे व भारतीय जनता पक्षाचे धोरण हे सहकाराविरोधात आहे.देशातील सहकारी बँका बुडाल्या आणि त्या बँकेत अडकलेले सर्वसामान्य जनतेचे पैसे बुडाले तरी सरकारला फिकीर नाही. उलट मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे या पद्धतीने धोरण राबवत आहेत.

मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर यांनी सांगितले , 2013 ला पुण्यातील रुपी बँकेला आरबीआय ने निर्बंध टाकले आणि ती आता बुडाली आहे यामध्ये पुण्यातील अनेक कष्टकरी नागरिकांचे पाच लाखाहून अधिक रक्कम असलेले पैसे अडकलेले आहे
.
या महाआरतीला माजी आमदार मोहन जोशी,मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर,वैभव दिघे, चेतन अग्रवाल,मंडळाच्या महिला कमिटीच्या अध्यक्ष ॲड.सुमंगल वाघ,उपाध्यक्ष किशोरी कचरे,मंडळाचे खजिनदार सुरेश निंबाळकर,उपाध्यक्ष संतोष बाहेती,दीपक शेडगे,राजू मोतीवाले,सेक्रेटरी हिमाली सडेकर,भारती घारे,रमेश खोपडे,आशिष वेलणकर,उदय लेले अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते