Pune Navratri Mahotsav | वयोगट३ ते१२ वर्षांमधील१००० हून अधिकमुली, रंगीबेरंगी ड्रेस,कपाळावर चुनरी,चंद्रकोर, स्तोत्रपठण, लकी ड्राॅ,खाऊ अशा उत्साही वातावरणात शिवदर्शन परिसरातील श्री लक्ष्मीमातामंदिराच्या प्रांगणात ललिता पंचमीनिमित्तपुणे नवरात्रौ महिला महोत्सव अंतर्गत आज कन्यापूजन कार्यक्रम संपन्न झाला.प्रांगणात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.सहभागी सर्व लहान मुलींच्या कपाळावर चुनरी,चंद्रकोरओम आणि कुमकुम टिलक सौ जयश्री बागुल यांनी लावलले .या सर्व लहान कन्यांचे पाय धुवून यावर स्वस्तिक चिन्ह काढण्यात आले.त्यानंतर औक्षण करून गजरे देण्यात आले. तसेच सामुहिक आरतीकरण्यात आली. (Aba Bagul)
यावेळी या मुलींनी नवारीसाडी, घागरा,पंजाबी ड्रेस असे रंगीबेरंगी पोशाख परिधान केले होते.या प्रसंगी अनेक मुलींनी गणपती स्तोत्र,श्रीसूक्त पठण, दुर्गास्तुतीतोंडपाठ म्हणून दाखवली आणि उपस्थितांची मने जिंकली. यावेळीपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.लकी ड्राॅमधीलविजेत्या मुलींना दप्तर सायकल इत्यादी बक्षिसे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठनेते खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते देण्यात आली तसेच सहभागीसर्व मुलींना टीफीन,वॉटर बॅग, क़ंमपास,लेजचे पाकीट व खाऊ देण्यातआला. याप्रसंगीपुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजकअध्यक्ष व माजी उपमहापौर आबाबागुल यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रत्येकीला तू मोठी झाल्यावर काय होणार ? असेविचारले. यावर अनेकींनी डॉक्टर,पोलीस इन्स्पेक्टर, शास्त्रज्ञअशी उत्तरे दिली. यावर आबाबागुल म्हणाले की मुलींना मोठी स्वप्ने बघुद्यात आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तताकरण्यासाठी पालकांनी विशेष मेहनत घेतली पाहिजे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे खा. श्रीनिवास पाटील यांनी या प्रेरणादायी उपक्रमाबद्दलआबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांचे कौतुक करून म्हंटले की, प्रत्येक मुलींनीशिकलेच पाहिजे तिच्यातील कला गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. कन्यापुजनाची हीसंस्कृती प्रत्येक कुटुंबाने जोपासली पाहिजे. पुणेनवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्ष जयश्री बागुल यांनीस्त्रीभृण हत्येविरूद्ध आवाज उठवण्याचे आवाहन करून म्हंटले कीपालकांनी याबाबत मुलगी झाली तरी आनंदच मानला पाहिजे.मुलीला खूप शिकवा किंवा विविध कलांमध्ये पारंगत करा.त्याचबरोबर आपले कुटुंब नातेवाईक, मित्र,शेजारी या सर्वांमध्ये स्त्री भृण हत्येबद्दल जागरण करा. यावेळी उद्योजिका अनुराधावाघोलीकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन संगीता बागुल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्युल्त्ता साळी, सोनमबागुल , नुपूर बागुल आदींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्राॅचा निकाल –
प्रथम क्रमांक -सीमा पाटील
द्वितीय क्रमांक -सबा शेख
तृतीय क्रमांक – स्वर्दा पोळेकर
उत्तेजनार्थ – हर्षदा लकडे