पुणे मनपाला ३० नोव्हेंबर पर्यंत कच्चा प्रारूप तयार करावा लागणार
: प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश
: राज्य निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना
पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यासाठी वेळापत्रकही निश्चित केले आहे. त्यानुसार आता पुणे महापालिकेला
राज्यातील मुदती संपणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करावे लागणार आहे. शासनाने पूर्वीच्या अध्यादेशात सुधारणा करून महापालिकेस तिच्या लोकसंख्येनुसार देय असलेल्या किमान व कमाल सदस्य संख्येत बदल केला आहे. या सुधारणेला अनुसरून सदस्य संख्या, प्रभागांची संख्या याचा तपशीलही जाहीर करण्यात आला असून शंका असल्यास तत्काळ राज्य निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा लागणार आहे.
महापालिका आणि आराखडा सादर करण्याची मुदत
नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली,
कोल्हापूर – 18 नोव्हेंबर
पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, ठाणे, उल्हासनगर,
नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला – 30 नोव्हेंबर
लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव- 25 डिसेंबर
पनवेल, मिरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा- 15 फेब्रुवारी
COMMENTS