Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

Ganesh Kumar Mule Jun 27, 2023 12:27 PM

Hoarding Fee rate hike | होर्डिंग शुल्क दर वाढीच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मंजुरी
पुणे महापालिकेला करावा लागणार ‘पाणी नियोजन आराखडा’ | राज्य सरकारचे निर्देश
Davos | Maharashtra News | दावोसमध्ये महाराष्ट्राने केले ३ लाख ५३ हजार कोटींचे विक्रमी सामंजस्य करार

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेने कोटी रुपये खर्च करून बांधलेली पावसाळी गटारे निरुपयोगी | रस्त्यावर पाण्याची थारोळी | विवेक वेलणकर

Pune Municipal Corporation | पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याची थारोळी साचू नयेत म्हणून गेल्या काही वर्षांत पुणे महापालिकेने (PMC Pune) अनेक रस्त्यांवर शेकडो कोटी रुपये खर्च करून पावसाळी गटारे बांधली आहेत. मात्र ही गटारे निरुपयोगी ठरत आहेत. रस्त्यावर पाण्याची थारोळी साचत आहेत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation)
 वेलणकर यांनी सांगितले कि, रस्त्यावर पाणी न साचता ते या गटारांमधून वाहून जावे ही या मागची मूळ कल्पना. मात्र यासाठी रस्ते डांबरीकरण करताना,  दुरुस्त करताना त्यांचा उतार या पावसाळी गटारांच्या मॅनहोल कडे राहील याची दक्षता घ्यावी लागते. मात्र महापालिकेचे रस्ते कंत्राटदार याची कोणतीही काळजी घेत नाहीत आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेले अधिकारी व कर्मचारी फक्त कंत्राटदाराची बिले मंजूर करण्यासाठीच काम करत असल्याने आज दोन दिवसांच्या थोड्या पावसाने रस्तोरस्ती तळी निर्माण झाली आहेत , त्यातली अनेक तर मॅनहोलच्या सभोवताली आहेत.  यातून पाणीच पाणी चोहीकडे आणि गेले पावसाळी गटार कुणीकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे ही पावसाळी गटारे निरुपयोगी ठरत आहेत आणि ती बांधण्यासाठी खर्च करण्यात आलेले नागरीकांच्या करांचे शेकडो कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत. (Pune News)
वेलणकर पुढे म्हणाले कि,  आमची मागणी आहे की रस्त्यावर पाणी साचण्याच्या जागांचा तातडीने सर्व्हे करावा आणि ज्या रस्त्यावर पावसाळी गटारे बांधली असूनही पाणी साचते आहे त्यासाठी जबाबदार कंत्राटदार व महापालिकेचे अधिकारी यांचेवर कारवाई करावी. (PMC Pune News)
——
News Title | Pune Municipal Corporation |  Rainy sewers built by Pune Municipal Corporation at a cost of crores of rupees are useless  Water splashing on the road  Vivek Velankar