Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे लोकार्पण!

पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या 'स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे' लोकार्पण

Homeadministrative

Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे लोकार्पण!

Ganesh Kumar Mule Sep 07, 2024 8:08 PM

Dr Rajendra Bhosale IAS | पुणेकर नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी महापालिका तयार करणार धोरण!
Why are you working till the midnight of 13th April to prepare for Ambedkar Jayanti? | Pune Municipal Commissioner’s question to the officials
PMC Pre Monsoon Work | BJP Pune | पुणे महापालिकेने पावसाळा पूर्व कामे 90% पूर्ण केल्याचा दावा चुकीचा | पुणे भाजपचा आरोप

Pune Municipal Corporation (PMC) – पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे लोकार्पण!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमार्फत नव्याने बांधण्यात आलेल्या ‘स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह’ लोकार्पण सोहळा  शनिवार रोजी हडपसर परिसरात पार पडला. (PMC Pune)

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. पुण्यामध्ये महानगरपालीकेने उभारलेली १४ नाट्यगृह असून त्यामध्ये स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह याचा समावेश झाला. सदर नाट्यगृह खूप भव्य असून  सर्व अद्ययावत सुविधांसह मुमज्ज असे नाट्यगृह आहे. सदरचे नाट्यगृह ८००० चौ.मी. जागेत ५७६७ चौ. फूट बांधकाम केले आहे. याची एकूण आसन क्षमता ८३७ इतकी आहे. सदर इमारतीमध्ये कलादालन सुद्धा भव्य स्वरुपात असून ते सुमारे १०००० चौ.फु. इतके सुसज्ज असे आहे. दोन सभागृह, कॉन्फरन्स हॉल,
नाटकाच्या तालमी करिता छोटे दोन हॉल, प्रशस्थ पार्किंग, प्रशस्थ उपहारगृह, बाहेरील बाजूस छानसे गार्डन आहे. तसेच नाट्यगृहाचे स्टेज पुण्यातील सर्व नाट्यगृहापेक्षा खूप मोठे ९०.४५ चौ.फु. इतके आहे. अतिथीगृहा (VIP कक्ष) मध्ये अद्ययावत मुमज्ज आसन व्यवस्था केलेली आहे. (PMC Cultural Centers Department)

नाट्यगृहाचे लोकार्पण झाल्यामुळे पुण्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या नाट्यप्रेमी रसिकांची मनोरंजनाची सोय झाली आहे. सदर नाट्यगृह पुण्याच्या वैभवात आणखी एक मनाचा तुरा झाला आहे.

‘स्व. विठ्ठलराव तुपे नाट्यगृह’ लोकार्पण सोहळ्यास  आमदार चेतन तुपे पाटील,  राज्य मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ बाप्पू शेवाळे, माजी महापौर वैशाली ताई बनकर, नंदाताई लोणकर,  गणेश ढोरे,  मारुती आबा तुपे हे माजी नगरसेवक उपस्थित होते. तसेच स्व. विठ्ठलराव तुपे यांचे अनेक जुने सहकारी आवर्जून उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुणे शाखेचे अध्यक्ष मा. मेघराज भोसले, नाट्यक्षेत्रातील अनेक कलाकार, हडपसर
भागातील अनेक कलाकार व रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

तसेच  डॉ. राजेंद्र ब. भोसले- प्रशासक तथा महापालिका आयुक्त, पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त, प्रशांत वाघमारे – नगर अभियंता, सुनील बल्लाळ उप आयुक्त सांस्कृतिक केंद्रे, संदीप कदम उप आयुक्त घनकचरा विभाग,  जयंत भोसेकर उप आयुक्त परीमंडळ ४, युवराज देशमुख मुख्य अभियंता भवन रचना, राजेंद्र तांबे कार्यकारी अभियंता व त्यांचे सहकारी, मनीषा शेकटकर मुख्य अभियंता व त्यांचे सहकारी, राजेश कामठे – प्रशासन अधिकारी सांस्कृतिक केंद्रे व सांस्कृतिक केंद्राचे सेवक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0