Pune Municipal Corporation Lokshahi Din| पुणे महापालिकेत ५ जुन रोजी लोकशाही दिनाचे आयोजन | नागरिकांसाठी हे आहे महापालिकेचे आवाहन!

HomeBreaking Newsपुणे

Pune Municipal Corporation Lokshahi Din| पुणे महापालिकेत ५ जुन रोजी लोकशाही दिनाचे आयोजन | नागरिकांसाठी हे आहे महापालिकेचे आवाहन!

Ganesh Kumar Mule May 22, 2023 8:17 AM

Savitribai Phule Pune University | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्व जागा लढविणार
Local body election| पालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
Tata Group Vs PMC | टाटाच्या उज्वल कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेच्या अंगाशी! | बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान

Pune Municipal Corporation Lokshahi Din | पुणे महापालिकेत ५ जुन रोजी लोकशाही दिनाचे आयोजन | नागरिकांसाठी हे आहे महापालिकेचे आवाहन!

Pune Municipal Corporation Lokshahi Din| जून महिन्यामधील पहिल्या सोमवारी म्हणजे पाच जून रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या मुख्य भवनात (PMC main Building) महापालिका आयुक्त कार्यालय (PMC commissioner office) सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन (Lokshahi Din) केलेले आहे. तसेच  १९/६/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत उप आयुक्त परिमंडळ १ ते ५ या कार्यालयामध्ये लोकशाही दिन आयोजित केलेला आहे. (Pune Municipal Corporation Lokshahi Din)

महापालिकेचे नागरिकांना आवाहन

महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) सांगण्यात आले कि लोकशाही दिनामध्ये निवेदने सादर करणाऱ्या नागरिकांना नम्र आवाहन करण्यात येते कि, मनपा मुख्य भवनातील लोकशाही दिनास उपस्थित राहणेकरिता संबंधित नागरिकांनी लोकशाही दिनापूर्वी १५ दिवस अगोदर मनपाच्या संबंधित विभागाकडे निवेदने २ प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. (PMC Pune news)
नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. या अर्जासोबत उप आयुक्त परिमंडळ कार्यालया स्तरावरील लोकशाही दिनामधीलप्राप्त झालेल्या उत्तराची झेरॉक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे. मनपाच्या विविध विभागांकडे लोकशाही दिनाचे १५ दिवसापूर्वी अर्जदारांकडून विहित नमुन्यात प्राप्त झालेले अर्ज, विहित प्रक्रियेनुसार योग्य अर्जा संदर्भात संबंधित खात्यांनी स्वीकारलेल्या अर्जाबाबत, लोकशाही दिनामध्ये पुढील प्रक्रियेकरिता पाठविलेल्या अर्जाबाबत लोकशाही दिनात सुनावणी होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. (Pune Municipal Corporation News)

कोणते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत-

१) न्यायप्रविष्ठ बाबी
२) राजस्व/ अपील
३) सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी
४) विहित नमुन्यातील अर्ज नसल्यास व त्या सोबत आवश्यक कागद पत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज
स्वीकारले जाणार नाही.
५) अंतिम उत्तर दिलेले आहे/ देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषय संदर्भात केलेले अर्ज.
वरील प्रमाणे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्विकारले जाणार नाहीत व अशा अर्जांवर लोकशाही दिनात सुनावणी घेतली जाणार नाही. असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
News Title | Pune Municipal Corporation Lokshahi Din | Organized Democracy Day in Pune Municipal Corporation on June 5  This is the appeal of the municipal corporation for citizens!