Pune Municipal Corporation Holiday | मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी बाबत महापालिका आयुक्तांचे आदेश जारी!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – येत्या बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी पुणे महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणे महापालिकेला सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी नुकतेच जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation-PMC)
भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. तरी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे व संदर्भ क्र. २ अन्वये उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सुट्टी जाहीर करणेबाबत कळविले आहे. (Pune PMC News)
त्याअनुषंगाने पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना २० नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी पुणे महानगरपालिकेची सर्व कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) दिवशी सुट्टी बंद राहतील. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सदर दिवशी दोन तासाची सवलत देण्यात येत आहे. असे महापालिका आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
सर्व खातेप्रमुख यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी मतदान केलेबाबत खातरजमा करून त्याबाबतचा अहवाल कामगार कल्याण विभागास सादर करावा. असेही आदेशात म्हटले आहे.
COMMENTS