Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस 

HomeपुणेBreaking News

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस 

कारभारी वृत्तसेवा Nov 08, 2023 4:33 PM

Diwali : अबब… दिवाळीत देशभरात 1.25 लाख कोटींच्या मालाची विक्री  : गेल्या 10 वर्षांचा विक्रम मोडला
PMC Social Welfare Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम २४ ऑक्टोबर पासून 
Diwali Gifts | Tax | दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर कर भरावा लागेल का?  |  भेटवस्तूंवरील कराचे गणित काय आहे ते जाणून घ्या

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस

 

Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महानगरपालिका, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने (PMC Garden Department)  १९९२ पासून दिपावलीच्या निमित्ताने किल्ले स्पर्धा आयोजित केल्या जातात. वाढत्या शहरीकरणामुळे, राहणीमानात झालेल्या बदलामुळे मुलांना किल्ले करण्यासाठी उपलब्ध होणारी अपुरी जागा असलेने, मुलांना जागा उपलब्ध करून आपल्याकडे असलेल्या अनमोल किल्ल्यांचा पुन्हा अभ्यास करता यावा, त्याबद्दल मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी, इतिहास भुगोलाची आवड वृध्दींगत व्हावी, शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने पुणे महानगरपालिका प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करीत आहे. यावर्षीही ९ ते १९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये २९ वे किल्ले स्पर्धा व प्रदर्शन छ.   ठिकाणी आयोजित करणेत आलेले असून स्पर्धेमध्ये एकूण तीन विभाग करणेत आलेले आहेत. अशी माहिती उद्यान विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation Garden Department)

उद्यान विभागाच्या माहितीनुसार  किल्ले स्पर्धांसाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. सदरहू स्पर्धेच्या किल्ल्यांचे परिक्षण इतिहास व भूगोल तज्ज्ञ यांचे कडून करण्यात येणार आहे. किल्ले स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रत्येक विभाग व गटामध्ये प्रथम क्रमांकास ५००१/-
व द्वितीय क्रमांकास ३००१/- व तृतीय क्रमांकास २००१/- रूपयाचे पारितोषिक देणेत येणार असून, तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ किल्ल्यांस र.रु.७००१/- चे खास पारितोषिक याप्रमाणे पारितोषिक देणेत येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. ०९/११/२०२३ रोजी सायंकाळी ४.०० वा. करण्यात येणार आहे.

यशस्वी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ ०९/११/२०२३ रोजी सायंकाळी ४.३० वा. संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन व बक्षिस समारंभ  महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांचे हस्ते होणार आहे.
तसेच मा. अति. महापालिका आयुक्त (ज), मा. अति. महापालिका आयुक्त (वि)व मा. अति. महापालिका आयुक्त (ई) पुणे महानगरपालिका उपस्थित
राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमामध्ये राजीव गांधी प्राणीसंग्रहालय व वन्यजीव संशोधन केंद्राच्या संकेतस्थळाचे व ऑनलाईन तिकीट बुकींग संगणक प्रणालीचे उद्घाटन होणार आहे.

या स्पर्धेमध्ये सुवर्णदुर्ग, बिजयदुर्ग, राजगड, सिंहगड, शनिवारवाडा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, तोरणा, अंतुरगड, सज्जनगड, सिंधुदुर्ग, कोरीगड, पारांडा, मल्हारगड, जंजीरा, पुरंदर काल्पनिक किल्ले
इ. किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत. प्रदर्शनामध्ये वरील ठिकाणी महाराष्ट्रातील विविध किल्ले किल्ल्यांबाबतच्या अधिक माहितीसाठी किल्ल्यांचे नकाशे, किल्ल्यांवर व पर्यावरणावर
आधारित घोषवाक्य इत्यादी माहिती सदरचे किल्ले पहाताना नागरिकांना पहावयास मिळणार आहे.

प्रदर्शन हे  ०९ नोव्हेंबर सायंकाळी ४.०० वा. नंतर ते दिनांक
१९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी विनामुल्य खुले राहणार आहे.