Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

Homeadministrative

Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

Ganesh Kumar Mule Jun 16, 2025 7:47 PM

MHADA : Pune : म्हाडाच्या घरांसाठी 22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ 
Pune  Mhada | डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा करुनच सदनिकेचा विक्री करारनामा करण्याचे पुणे म्हाडाचे आवाहन
MHADA pune | पुणे म्हाडाकडून 5 हजार घरांची लॉटरी 

Pune MHADA | पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून सदनिकांसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे नागरिकांना आवाहन

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळ्यांची विक्री, हस्तातरण व अदलाबदल) विनियम, 1981 आणि म्हाड अधिनियम (जमिनीची विल्हेवाट) नियम 1981 मधील तरतुदीनुसार पुणे, सोलापुर, सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत 52 अनिवासी गाळे व 28 कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने वितरीत करण्याचे नियोजित आहे. विस्तृत पात्रता निकष, प्रत्येक गाळ्याचे विस्तृत विवरण, सामाजिक आरक्षण, अटी व शर्ती तसेच ऑनलाईन अर्ज सूचना माहिती पुस्तिका इत्यादी सर्व माहितीसाठी नागरिकांनी www.eauction.mhada.gov.in व www.mhada.gov.in संकेतस्थळाला भेट देवून अर्ज करावा, असे आवाहन मंडळाचे मुख्य अधिकारी यांनी केले आहे. (MHADA Pune)

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांचेमार्फत 15% सामाजिक गृहनिर्माण योजना व 20% सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी रिक्त राहीलेल्या सदनिका विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वाटप करण्याचे नियोजित आहे. वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरीत करण्यासाठी 10 एप्रिल 2025 दुपारी 12.00 वा. पासून ऑनलाईन पद्धतीने खालील संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु आहे, अर्जदारांना सुचित करण्यात येते, कि त्यांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा. विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रीया निरंतर चालू राहिल, गरजू व पात्र लाभार्थ्यांनी https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर नोदणी पुर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा.

पंतप्रधान यांनी 17 नोव्हेंबर 2024 रोजी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ची घोषणा केली असून त्यास अनुसरुन महाराष्ट्र शासनाने सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) 2.0 राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते कि, वरील योजनेअंतर्गत पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ पुणे मार्फत नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करुन देण्यासाठी गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचे नियोजित आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी लाभार्थ्यांची नोंदणी व निवड प्रथम करावयाची असल्याने https://pmaymis.gov.in PMAYmis2 2024/Auth/Login.aspx या यूनिफाईड वेब पोर्टलवर या वेबलिंकवर सदनिका घेण्यास इच्छुक असणाऱ्या जास्तीत जास्त अर्जदारांनी नोंदणी करावी.

सदनिका वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक असून देकार पत्र हे उपमुख्य अधिकारी,म्हाडा यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नाही, अशी माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.