Pune Metro Service in Ganesh Utsav | गणेशोत्सव काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत | गणेशोत्सवातील वेळापत्रक जाणून घ्या 

Homeadministrative

Pune Metro Service in Ganesh Utsav | गणेशोत्सव काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत | गणेशोत्सवातील वेळापत्रक जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 06, 2024 9:56 PM

Ganesh Utsav Meeting | PMC Pune | पुणे महापालिकेची गणेश मंडळासोबत संयुक्त बैठक 28 ऑगस्ट ऐवजी 8 सप्टेंबरला
Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक
Pune Traffic | दहीहंडी उत्सवात नागरिकांची कोंडी; गणेशोत्सवात वाहतूक नियोजन नीट व्हावे | भाजप प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी 

Pune Metro Service in Ganesh Utsav | गणेशोत्सव काळात मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत | गणेशोत्सवातील वेळापत्रक जाणून घ्या

 

Pune Metro – (The Karbhari News Service) – गणेशोत्सवाच्या (Pune Ganesh Utsav) काळात गणेश मंडळांचे देखावे (Ganesh Mandal Decoration) बघण्यासाठी महामेट्रो (Mahametro) कडून नागरिकांना पर्वणी देण्यात आली आहे. या काळात  नागरिक मोठ्या प्रमाणावर शहराच्या मध्य भागात येत असतात. नागरिकांच्या सुविधेसाठी गणेशोत्सव काळात मेट्रोच्या वेळात बदल करून मेट्रोची प्रवासी सेवा मध्यरात्रीपर्यंत चालवण्यात येणार आहे. तसेच मेट्रो फेऱ्यांच्या संख्येतही वाढ करण्यात येणार आहे. एरवी मेट्रोची सेवा दररोज सकाळी सहा ते रात्री १० या वेळेत असते. (Pune Metro Service)

महामेट्रो कडून सांगण्यात आले कि, अनंत चतुर्दशीच्या दिवशी मंगळवार सकाळी ६ ते बुधवारी  सकाळी ६ असे २४ तास मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे.

मागील वर्षी महामेट्रोकडून गणेशोत्सवात तीन दिवस रात्री १२ पर्यंत सेवा सुरू ठेवली होती. त्यानंतर नागरिकांनी शेवटच्या दिवशी पूर्णवेळ सेवा सुरू ठेवण्याची मागणी केली होती. ही बाब लक्षात घेऊन रस्त्यावरील इतर वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

मेट्रोचे  गणेशोत्सवातील वेळापत्रक

७ ते ९ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत.
० ते १६ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत.
७ सप्टेंबर :सकाळी  रात्री १० पर्यंत.

१८ सप्टेंबर : सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत.