Pune Metro News | गर्दीच्या वेळी दर ६ मिनिटांनी पुणे मेट्रो धावणार!
Pune Metro Timetable – (The Karbhari News Service) – सध्या गर्दीच्या वेळेत (९ ते ११, ४ ते ८) दर ७ मिनिटाला १ ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे पुरविण्यात येत आहे. आता १५ ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर ६ मिनिटाला सेवा पुरविण्यात येणार आहे. विना गर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक ट्रेन असणार आहे. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली.
सद्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून ४९० फेऱ्यांव्दारे मेट्रो सेवा पुरवत आहे. दर ६ मिनिटाला ट्रेन सेवा यामुळेअधिक ६४ फेऱ्या वाढणार आहे. दिनांक १५ ऑगस्टपासून एकूण फेऱ्या ५५४ वाढणार आहे. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.
दर ६ मिनिटाला ट्रेन चालवण्यास मेट्रोदोन महिन्यापासून प्रयत्नशिल होती. त्या अनुषंगाने अनेकवेळा चाचण्या घेण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर दि. १५ ऑगस्टपासूनदर ६ मिनिटाला सेवा हा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै, २०२५ या महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून, दैनंदिन प्रवासी संख्या १,९२,००० पर्यंत वाढली . ऑगस्ट, २०२५ मध्येप्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आज पर्यंत ऑगस्ट २०२५ मध्ये प्रवाशांची सरासरी संख्या २,१३,६२० निदर्शनास आली आहे.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री.श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुणे मेट्रोने दैनंदिन मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. आता दर सहा मिनिटाला ट्रेन सेवा ही पुरवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सद्या पुणे मेट्रो दिवसाला ४९० फेऱ्यांव्दारे सेवा पुरविते त्यामध्ये ६४ सेवांची वाढ करून १५ ऑगस्टपासून ५५४ एवढी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना फायदा होणार आहे.





COMMENTS