Pune Metro News | जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ | स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन

Homeadministrative

Pune Metro News | जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ | स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन

Ganesh Kumar Mule Sep 02, 2024 8:56 PM

Pune Metro Timetable | धुलीवंदनाच्या दिवशी पुणे मेट्रोने प्रवास करणार असाल तर मेट्रोची बदललेली वेळ जाणून घ्या 
Pune Metro | Diwali Laxmipujan| पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना
Pune Metro Timetable | पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल | दोन्ही मार्गावर वेळेत बदल

Pune Metro News | जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ | स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन

| केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Pune Metro – (The Karbhari News Service) – पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रोमार्गावरील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या शेवटच्या टप्प्याचे काम पूर्णत्वाकडे आले असून काही तांत्रिक परवानग्या बाकी आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांतच या मार्गावरदेखील मेट्रो धावू लागेल, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री (सहकार व नागरी हवाई वाहतूक) मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Pune News)

या मार्गावर मेट्रोकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आ. माधुरी मिसाळ, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर यांच्यासह अधिकारी समवेत होते.

मोहोळ पुढे म्हणाले की, ‘काही स्थापत्यविषयक कामे पूर्ण केल्यानंतर आणि तांत्रिक परवानग्या मिळाल्यानंतर येत्या काही दिवसांतच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल. त्यासंदर्भातील आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम ‘महामेट्रो’कडून वेगाने सुरू आहे. सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. काही स्थानकांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होईल. लवकरच या मार्गिकेचे उद्घाटन होणार आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेटने मंजुरी दिलेल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचे भूमिपूजनही याचवेळी होणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. वनाझ ते रामवाडी मार्ग १०० टक्के पूर्णत्वाकडे गेला असून पुणेकर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट हा १७.५ किलोमीटर लांबीचा मार्ग ९० टक्के कार्यान्वित झाला असून त्यातील दिवाणी न्यायालय ते स्वारगेट मार्गाचे कामही वेगाने पूर्ण होत आहे. लवकरच हाही संपूर्ण मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल. तसेच, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित मेट्रोमार्गासाठी आवश्यक परवानग्या मिळवून लवकरात लवकर त्यांचेही काम सुरू करण्यात येईल, असे मोहोळ म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0