Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट 

HomeपुणेBreaking News

Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट 

कारभारी वृत्तसेवा Dec 26, 2023 3:38 PM

Pune Metro Travel with Cycle | पुणे मेट्रोत सायकल घेऊन प्रवास करू शकता का? जाणून घ्या सविस्तर
Pune Metro Launches One Pune Vidyarthi Pass | पुणे मेट्रोकडून ‘एक पुणे विद्यार्थी पास’ कार्डची विद्यार्थ्यांना भेट 
Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर एसटी स्टँड दिरंगाईबाबत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी माफी मागावी – दत्ता बहिरट

Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट

| पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार

Pune Metro | New Year 2024 | १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गाचे लोकार्पण होऊन या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ (पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट) आणि मार्गिका २ (वनाझ ते रामवाडी) मिळून एकूण २४ किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ९ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. (Pune Metro | New Year 2024)

लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापर आणि नवीन वर्ष्याच्या निमित्ताने पुणे मेट्रो आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु असते. यामध्ये सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रोच्या दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर ९ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर १७ तर मार्गिका २ वर १८ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २० फेऱ्या, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २५ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर १० व मार्गिका २ वर ८ फेऱ्या होत होत्या.

पण आता प्रवाश्यांची वाढती संख्या आणि प्रवाश्यांच्या सोयीसाठी नवीन वर्ष्याच्या निमित्ताने पुणे मेट्रो आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. १ जानेवारी २०२४ पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रो दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १२ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर ७.५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २४ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर ३२ व मार्गिका २ वर ३० फेऱ्या, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर ७.५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर ३२ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १३ फेऱ्या प्रत्येक स्थानकावरून उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाश्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होईल. त्याच बरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे. या आधी दिवसभरात मार्गिका १ वर ८१ फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेऱ्या होणार आहेत आणि मार्गिका २ वर ८० फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून १११ फेऱ्या होणार आहेत. गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होत्या, तर होत असत तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ८ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ४ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होत्या तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होणार आहेत.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, “१ जानेवारी २०२४ पासून होणाऱ्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे व वेळेची देखील बचत होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या/ येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल. “