Pune Metro Card | पुणे मेट्रोचा ‘१ लाख मेट्रो कार्ड’ चा टप्पा पार | पुणेकरांची ‘पुणे मेट्रो कार्ड’ ला पसंती

Homeadministrative

Pune Metro Card | पुणे मेट्रोचा ‘१ लाख मेट्रो कार्ड’ चा टप्पा पार | पुणेकरांची ‘पुणे मेट्रो कार्ड’ ला पसंती

Ganesh Kumar Mule Apr 22, 2025 7:53 PM

Vetal Tekadi Trek | शिवसेना ठाकरे गटाकडून वेताळ टेकडी ट्रेकचे आयोजन
Pune Traffic | विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विद्यापीठाची सकारात्मक भूमिका
Vijaystambh Abhiwadan | Perne Fata | विजयस्तंभ अभिवादन दिनी बार्टी उभारणार ३०० पुस्तक स्टाॕलचे दालन

Pune Metro Card | पुणे मेट्रोचा ‘१ लाख मेट्रो कार्ड’ चा टप्पा पार | पुणेकरांची ‘पुणे मेट्रो कार्ड’ ला पसंती

 

Metro Card – (The Karbhari News Service) – पुणे मेट्रोने प्रवाश्यांना तिकीट काढण्यासाठी विविध पद्धती उपलब्ध करून दिल्या आहे. उदा. तिकीट वेन्डिंग मशीन, व्हाट्स अँप तिकीट, किऑस्क द्वारे तिकीट, मेट्रो कार्ड आणि तिकीट खिडकी ई. यांमधील सर्वात सोपी, आरामदायक व आधुनिक पद्धत म्हणजे पुणे मेट्रो कार्ड. १२ ऑगस्ट २०२३ रोजी मा. नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘एक पुणे मेट्रो कार्ड’ चे लोकार्पण करण्यात आले. काल द २१ एप्रिल २०२५ रोजी पुणे मेट्रोने १ लाख मेट्रो कार्डच्या विक्रीचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे. यामधून प्रवाश्यांची पुणे मेट्रोला पसंती आणि विश्वास प्रदर्शित होतो. या १ लाख कार्ड मध्ये दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी पर्यंत एक पुणे कार्ड – ५८,२७७, विद्यार्थी पास कार्ड – २३,३७८ आणि नॉन-केवायसी कार्ड – १८,३८९ अशी विक्री झालेली आहे. पुणे मेट्रोच्या एकूण उत्पन्नामधील ८० % उत्पन्न हे ‘डिजिटल पेमेंट’ च्या माध्यमातून येत. भारतातील सर्व मेट्रोमध्ये पुणे मेट्रो डिजिटल पेमेंट मध्ये सर्वात अग्रेसर आहे.  अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro News)

पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, मेट्रोच्या वनाझ ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट या दोन्ही मार्गिकांवर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. शहरातील विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून पुणे मेट्रोला नागरिकांची वाढती पसंती मिळत आहे. सध्या पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ६० हजार अशी आहे. पुणे मेट्रोच्या टप्पा एक च्या विस्तारीकरणाला सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गिकेचे काम प्रगती पथावर आहे, तर स्वारगेट ते कात्रज या भूमिगत मार्गिकेच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरु आहे.

पुणे मेट्रो कार्ड मध्ये ‘एक पुणे कार्ड (NCMC कार्ड), विद्यार्थी पास कार्ड आणि नॉन-केवायसी कार्ड (MTS कार्ड)’ अशी ३ प्रकारची कार्ड आहेत. पुणे मेट्रोची सर्व कार्ड ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ च्या नियमांचे पालन करतात. या तिन्ही कार्ड मध्ये तिकिटाच्या रकमेवर सूट देण्यात येते. एक पुणे कार्ड व नॉन-केवायसी कार्ड वर सोमवार ते शुक्रवार १० % सवलत देण्यात येते व शनिवार आणि रविवारी या दिवशी ३० % सवलत देण्यात येते. एक पुणे कार्ड घेताना नागरिकांना केवायसी करणे बंधनकारक असून ते अ-हस्तांतरणीय आहे. नॉन-केवायसी कार्ड घेताना केवायसी करणे बंधनकारक नाही व हे कार्ड हस्तांतरणीय आहे. विद्यार्थी पास कार्ड हे फक्त विद्यर्थ्यांसाठी असून, ते घेताना विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. तसेच या कार्डवर सोमवार ते रविवार, दर दिवशी ३० % सवलत देण्यात आली आहे. मेट्रो कार्ड असणाऱ्या प्रवाश्याना तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, AFC गेटवर टॅप करून प्रवासी स्थानकात प्रवेश करू शकतात. प्रवास करताना गंतव्य स्थानकात बाहेर पडताना पुन्हा FC गेटवर कार्ड टॅप केल्यावर तेवढ्याच प्रवासाचे पैसे कार्ड मधून वजा होतात. कार्ड हा अत्यंत सोपा, वेळेची बचत करणारा व पर्यावरण पूरक पर्याय असल्यामुळे पुणे मेट्रो सर्व प्रवाश्याना पुणे मेट्रो कार्ड घेण्याचे आवाहन करीत आहे.