Pune Lok Sabha By Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकर घ्या | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश
Pune Lok Sabha By Election | गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By election) घ्या असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) निवडणूक आयोगाला (Election Commission) दिला आहे. (Pune Lok Sabha By Election)
संसदेच्या विद्यमान सदस्याच्या निधनानंतर एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवण योग्य नाही असेही उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 10 महिन्यांत निवडणूक आयोगानं काहीच का केलेलं नाही?, असा सवाल करत सुघोष जोशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर कायद्यानुसार सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेण्याची तरतूद असताना ती का घेण्यात आली नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आणि याबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देण्याचा इशारा न्यायालयाने दिला होता. आज मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश देत याचिका निकाली काढली.