Pune Heritage Walk | पुणे शहरात विविध ठिकाणांचे “हेरीटेज वॉक” सुरु केले जाणार | १०० पासून ते ५०० पर्यंत असणार तिकीट
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे शहरात विविध ठिकाणांचे “हेरीटेज वॉक” बंद होते. ते आता नव्याने सुरु केले जाणार आहेत. त्यासाठी १०० पासून ते ५०० रुपये पर्यंत तिकीट असणार आहे. यासाठी २ वर्षासाठी अजित आपटे यांच्या सोबत MOU केला जाणार आहे. तसेच हेरीटेज वाक ची प्रसिद्धी करण्यासाठी २ लाख पर्यंत खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
गौरवशाली इतिहास लाभलेल्या एकेकाळच्या पुनवडीचा विकास होऊन १९५० साली पुणे नगरपालिकेचे पुणे महानगरपालिकेमध्ये रुपांतर होऊन आता एका महानगराच्या दिशेने पुणे शहराची वाटचाल सुरु आहे. शहरामध्ये जलद गतीने होणाऱ्या फेरबदलाचा परिणाम सांस्कृतिक वारसांवर होत असून पुणे शहराला असलेली ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहता टुरिझम डेव्हलपमेंट हि पूर्ण शहरासाठी एक उत्तम संधी आहे. या अनुषंगाने ‘हेरीटेज वॉक’ हा उपक्रम पुणे महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी चालू करण्यात आला.
पुणे शहरामध्ये सुमारे २४९ लिस्टेड हेरीटेज मिळकती असून हेरीटेज ग्रेड १ यादीतील शनिवारवाडा ,लालमहाल,विश्रामबागवाडा,नानावाडा, कसबा गणपती,महात्मा फुले मंडई, ई अनेक महत्वपूर्ण मिळकती शहराच्या दाट वस्तीच्या भागामध्ये आहेत. पुणे शहराच्या झपाट्याने विस्तार होत असून आता पुणे शहराचा वाढीचा वेग व बदलणारे स्वरूप पाहता या शहराचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्वही जपणे आवश्यक झालेले आहे. पुणे शहराचे महत्व, जडणघडण व जुन्या पुण्याची ओळख शहरात येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना तसेच भावी पिढीला होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दृष्टीने हेरीटेज वॉक हा महत्वपूर्ण प्रकल्प यापूर्वी २०१२ मध्ये पुणे महानगरपालिका व जनवाणी संस्था यांचे संयुक्त सहभागातून चालू करणेत आला होता. अशाप्रकारचे प्रकल्प भारतातील अनेक शहरामध्ये कार्यरत आहेत.
यामध्ये शनिवारवाडा ते विश्रामबाग वाडा दरम्यानची सुमारे १५ ऐतिहासिक वास्तूची माहिती तज्ञ गाईडच्या सहाय्याने पायी फिरुन पर्यटकांना देण्यात येत होती. सदर वॉक २ वर्षे चालला . या वॉकला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. भारत सरकारने या वॉकला २०१३-१४ सालचा उत्तम हेरीटेज वॉक मानून नॅशनल अवार्ड देऊन गौरवलेले आहे .त्या नंतर पुढील काळामध्ये जनवाणी संस्थेने टेंडर प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला नाही. यामुळे सदर हेरीटेज वॉक पुढे चालू राहिला नाही.
या नंतर संदीप गोडबोले व पुणे मनपा यांच्या मध्ये प्रायोगिक तत्वावर एका वर्षाच्या करारावर सन २०२३-२४ मध्ये हेरीटेज वॉक उपक्रम पुन्हा चालू करण्यात आला. या वॉकला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. या वॉकमध्ये जास्तीत जास्त १८ जणांचा ग्रुप दर शनिवार व रविवारी सकाळी ७ वाजता आयोजित करण्यात येत होता .पर्यटक व नागरिकांना या उपक्रमात सहजरीत्या सहभागी होणेच्या दृष्टीने “पेमेंट गेटवे” द्वारे ऑनलाईन अॅप विकसित करण्यात आले. या अॅपद्वारे ऑनलाईन तिकीट बुकिंग करून नागरिक व पर्यटक हेरीटेज वॉक मध्ये सहभागी होत होते. सदर तिकिटांचे पैसे पुणे म.न.पा. मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र बजेट हेड कोड नं.SI25A131E मध्ये जमा होत होते.
अजित वामन आपटे यांचे कडून खाजगीरीत्या हेरीटेज वॉकचे आयोजन केले जात आहे. त्यांच्या टीम ८ वर्ष हेरीटेज वॉक राबविला आहे. तसेच विशेष निमित्ताने जसे G 20 DELIGATES, वरिष्ठ राज्य तथा केंद्रीय संदीप गोडबोले, सोनाली एम शहा व स्वतः डॉ. अजित आपटे हे आहेत. संदीप गोडबोले यांनी शासकीय अधिकारी तसेच सैन्यातील वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी हेरीटेज वॉक घेतलेले आहे. सोनाली एम म्हणून त्यांनी भारतीय इतिहास, जैन कला, वास्तुकलेचे ज्ञान घेतलेले आहे. पुरातन भारतीय ज्ञान जतन करणे व शहा या इंडोलॉजीस्ट व इंटेरिअर डिझाईन म्हणून काम करत असून त्यांना २५ वर्षांचा अनुभव आहे. विध्यार्थी (संशोधन, प्रकाशन व हेरीटेज वॉक च्या माध्यमातून त्यांच्याद्वारे प्रसार करण्याचे काम त्यांनी केले आहे. डॉ. अजित आपटे यांना कर्मचारी व्यवस्थापन, प्रशासन सार्वजनिक संबंध यामध्ये ३७ वर्ष तसेच आधुनिक व्यवस्थापन व इतर ऐतिहासिक विषयांवर जवळपास ७०० च्या वर व्याखाने दिलेली आहेत. गाईड सिंहगड व्यवस्थापकीय विद्यालय येथे अतिथी व्याखात्ये म्हणून काम केले आहे व छत्रपती शिवाजी महाराजांवर म्हणून त्यांनी ११ वर्षात जवळपास ३०० हेरीटेज वॉक पुण्यात केलेले आहेत. डॉ. अजित आपटे यांनी हेरीटेज वॉक हा उपक्रम संयुक्त सहभागातून करणेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. यामध्ये त्यांनी यापूर्वीच्याच अटीवर खालील हेरीटेज वॉक करणेबाबत प्रस्ताव दिला आहे.
Know Pune या वॉकमध्ये पुणे मनपा भवन जवळील शिवाजी पूल येथून प्रत्येक शनिवारी व रविवारी सकाळी ७ वाजता हेरीटेज बॉकिंग टूरला सुरुवात होईल. साधारणपणे ९.३० वाजता विश्रामबागवाडा येथे हेरीटेज वॉक पूर्ण होईल. अंदाजे २.५० किमी चा फेरफटका व साधारण अडीच तासाचा वेळ या वॉकिंग टूरला लागेल. know pune- या गाईड दूरमध्ये शिवाजी पूल घोरपडे घाट, शनिवारवाडा, कसबा गणपती, लाल महाल दगडूशेठ हलवाई मंदिर, भिडे वाडा, बेलबाग मंदिर, पुणे नगर वाचन मंदिर, तुळशीबाग, मंडई, विश्रामबागवाडा इ. वास्तू व परिसराची व त्या अनुषंगाने शहराच्या इतिहासाची माहिती देण्यात येईल हि माहिती सांगण्यासाठी तज्ञ गाईड असतील.
नागरिकांचा व पर्यटकांचा प्रतिसाद पाहून या टूरमध्ये आवश्यक ते फेरबदल करणेत येतील .तसेच या मार्गातील ऐतिहासिक वास्तूंची जतन व संवर्धन व सुशोभीकरणाची कामे टप्प्याटप्प्यामध्ये करण्यात येतील मनपातर्फे लाल महाल नानावाडा विधामबागवाडा या ऐतिहासिक वास्तूंची जतन संवर्धनाची बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत.आता उर्वरित राहिलेली कामे उपलब्ध तरतुदीनुसार पूर्ण करण्यात येत आहेत. नानावाडा येथे आद्य सशस्र क्रांतिकारक यांचे जीवनचरित्रावर आधारित संग्रहालयाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आलेले आहे. .पुणे पुणे शहरातील इतर ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू ठिकाणी देखील वेगवेगळ्या हेरीटेज टूर भविष्यात करता येतील. सदर ठिकाणे दूरदूरची असल्याने सदर वॉक हा पायी न ठेवता बसद्वारे करता येईल.
Know Pune –
१) लॉयड्स ब्रिज / शिवाजी ब्रिज / नवा ब्रिज
२) घोरपडे घाट
३) शनिवारवाडा
४) कसबा गणपती
५) लाल महाल
६) नाना वाडा
(७) भाऊ रंगारी निवासस्थान ८) तांबडी जोगेश्वरी
९) दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर १०) भिडे वाडा
११) नगर वाचन मंदिर १२) बेलबाग मंदिर
१३) महात्मा फुले मंडई (रे मार्केट) १४) तुळशीबागवाले राम मंदिर १५) विश्रामबाग वाडा
Pune camp walk –
(१) झिरो स्टोन
२) सेंट पॉल चर्च
३)लाल देऊळ / ज्यू सिनेगॉग
४)पारसी अॅग्वाटी (पवित्र अग्रिम पारशी प्रार्थना केंद्र)
५) दस्तूर मेहेर रोड
६) सेंट फ्रान्सिस झेवियर चर्च
७) छत्रपती शिवाजी मार्केट
८) व्हिक्टरी थिएटर (कैपिटल थिएटर)
९) कॅम्प लायबरी
. Freedom Trail Walk
१) हुतात्मा स्मारक
२) उमाजी नाईक स्मारक
३) सारसबाग येथील स्मारक
मनपा वेबसाईटवर लिंक ओपन करून देण्यात येईल आणि मनपाचे अधिकृत अकाऊंटवर इच्छुक पर्यटकांना तिकीट फी भरता येईल.
पुणे मनपातर्फे या मार्गातील पुणे मनपा मालकीच्या ऐतिहासिक वास्तूंची दुरूस्ती, जतनसंवर्धनाची कामे करण्यात येतील तसेच पर्यटन वाढीसाठी माहिती पुस्तिका, ब्रॉशर्स इ. तयार केली जातील.
अजित वामन आपटे यांचे समवेत २ वर्षाकरिता हेरिटेज वॉक व त्यापोटी कॉन्टॅक्ट फी म्हणून त्यांना ६ ते १३ पर्यटकांच्या संख्येसाठी र.रू.३१००/- प्रति वॉक व १३ ते १८ पर्यटक संख्येसाठी प्रमाणशीर र.रु. ३१०० ते ४१००/- प्रती वॉक अदा केला जाईल. हेरिटेज वॉकचे प्रसिध्दीसाठी माहितीपुस्तिका, ब्रोशर, पोस्टर इ. साठी कोटेशन पध्दतीने र.रू. २/- लक्ष पर्यंत खर्च केला जाईल. तसेच हेरिटेज वॉककरिता प्रौढांसाठी र.रू. ३००/- व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी र रु.२००, विदयार्थासाठी र.रू. १००/-, परदेशी पर्यटकांना र.रू.५००/- फी आकारणी केली जाणार आहे.
COMMENTS