Pune Education News | गाडकवाडी गाव “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून झाले चकाचक! | गावच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन केला शिबिरार्थींचा यथोचित सन्मान!”
Pune Education News | दापोडी पुणे येथील श्रीमती सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे (C K Goyal Art and Commerce College Dapodi) “विशेष संस्कार शिबिर” रविवार १४ जानेवारी ते शनिवार 20 जानेवारी २०२४ या कालावधीत मु.पोस्ट गाडकवाडी ता. खेड जि. पुणे येथे मोठ्या उत्साहात संपूर्ण झाले. विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये गाडकवाडी गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यातून गावामध्ये मोठा बदल झाला असून संपूर्णगाडकवाडी गावचकाकचक होऊन त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

शिबिरामध्ये खालील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
१) सकाळ सत्रात: दररोज८;०० ते ११:३० या वेळेत”श्रमदान”अंतर्गत वेगवेगळी श्रमदानाची कामे करण्यात आली त्यामध्ये जि. प .प्राथमिक शाळा गाडकवाडी येथे परिसर स्वच्छता, शालेय परिसरातील झाडांना आळी करणे, व झाडांना पाणी घालणे, शाळेच्या परिसरातील दगड, खडी, उचलून बाजूला करणे, शाळेच्या पाठीमागे बाजूस सपाटीकरण करणे, डोंगरावरून येणारे पाणी बाजूला करणे साठी चार खोदणे,
गावातील सर्व रस्ते साफसफाई करणे मुरूम खडी बाजूला करणे, झाडलोट करून स्वच्छ करणे,
ग्रामपंचायत, चावडी, मंदिर परिसर, व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी परिसर स्वच्छता, गाजर गवत काढणे, झाडलोट करणे व परिसर स्वच्छ करण्याचे काम केले,
वृक्षारोपण-गावामध्ये शाळा परिसर, ग्रामपंचायत परिसरामध्ये, वृक्षारोपण करण्यात आले.
वनराई बंधारा: पर्यावरण जागृतीच्या संदर्भात पाणी आडवा पाणी जिरवा संदेश देऊन स्वयंसेवकांकडून वनराई बंधारा बांधण्यात आला.
२) दुपार सत्रात: व्याख्यानमाला: प्रबोधन उद्बोधन अंतर्गत दररोज दुपारी ३;०० ते ४:३० या वेळेत व्याख्यान मला संपन्न झाली. या व्याख्यान माले अंतर्गत :श्री. संपत गारगोटे-यांचे जीवन सुंदर आहे, सौ. शर्मिला सांडभोर-महिला उद्योजकता विकास, प्रा. परबतराव बैसाणे-कवितेच्या गजलेच्या दुनियेत,प्रा. डॉ . बाळासाहेब माशेरे-शिवार फेरी, श्री. संतोष घुले-अपरिचित शिवराय, श्री. मयूर दौंडकर-उद्योजकता विकास, या विषयावर व्याख्यानमाला संपन्न झाली व्याख्यानमालेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
३) सायंकाळचे सत्र: दररोज ८:०० ते १०:०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम:-गावातील लोकांच्या मनोरंजनासाठी उद्बोधनसाठी दररोज सायंकाळी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये प्रवचन, भारुड, गवळण, विविध सामाजिक विषयावर प्रबोधन पर प्रसंग नाट्य, विनोदी अभिनय मिमिक्री, मॉडेल्स, संमोहन/सर्प समज गैरसमज अंधश्रद्धा निर्मूलन-सादर करते श्री. अतुल सवांडे आणि सहकारी, गावातील लोकांचे व जि. प. शाळा गडकवाडी व जि. प. शाळा निघोजे शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रुप डान्स, वैयक्तिक डान्स, मंगळागौर, यासारखे विविध अंगी कार्यक्रम संपन्न झाले. ग्रामस्थांची उपस्थिती या कार्यक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात लाभत होती यात्रेसारखे लोक जमा होत होते.
४) विविध सामाजिक उपक्रम; शिबिराच्या माध्यमातून गावातील लोकांना उपयुक्त असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये
अ) महिला मेळावा/उद्योजकता विकास/ शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन /आरोग्य जागृती /हळदी कुंकूशिबिर: १५ जानेवारी “मकर संक्रांत “निमित्त या उपक्रमाचे आयोजन शिबिर कालावधीत करण्यात आले असून “मुंबई माता बालसंगोपन केंद्र राजगुरुनगर” यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरासाठी १६० पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या . या मेळाव्यास महिलांकडून उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
ब) मोफत पशु चिकित्सा शिबिर: बुधवार दिनांक १७ जानेवारी २०२४रोजी सकाळी ९:३० ते ११:30 यावेळेस जि. प. प्राथमिक शाळा गाडकवाडी या ठिकाणी गावातील जनावरांसाठी “मोफत पशु चिकित्सा शिबिर” आयोजित करण्यात आले होते. “तालुका लघु पशु संवर्धन चिकित्सालय राजगुरुनगर” यांच्या सौजन्याने सदर शिबिर राबविण्यात या शिबिरासाठी डॉ.प्रशांत पोखरकर (प्रमुख तालुका लघु पशुसंवर्धन राजगुरुनगर) व इतर सहकारी पशुवैद्यकीय डॉक्टर उपस्थित होते. गावातील १७५ अधिक जनावरांची तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. या शिबिरास गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रसिद्ध दिला
के) मोफत डोळे तपासणी औषधोपचार व चष्मे वाटप शिबिर;: गुरुवार दिनांक १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९;३० ते १२:०० या कालावधीत गावामध्ये वृद्ध लोकांची संख्या जास्त असल्याकारणाने त्याचा विचार करून मोफत डोळे तपासणी व औषध उपचारा, चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते.
“मयूर दौंडकर युवा फाउंडेशन राजगुरुनगर” यांच्या सौजन्याने सदर शिबिर राबविण्यात आले. या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून १४० पेक्षा अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला.

५) शिवार फेरी शैक्षणिक सहल: गावाची विद्यार्थ्यांना सर्वांगीण माहिती मिळावी पाहणी व्हावी यासाठी “शिवार फेरी शैक्षणिक सहलीचे “आयोजन करण्यात आले या सहलीतून गावाची सर्वांगीण पाहणी करण्यात आली.
६) ग्रामसर्वे: शिबिरामध्ये ग्राम सर्वे करण्यात आला असून गावची लोकसंख्या, गावातील मंदिरे ,गावातील ग्रामपंचायत तिची कामे, लोकांचा आर्थिक स्थर ,पीक पाहणी, पाण्याचे स्रोत, उद्योग व्यवसाय, या सर्वा विषयी माहिती घेण्यात आली.
७) स्वच्छता फेरी स्वच्छता दिंडी: शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० ते ११:०० या वेळेत संपूर्ण गावात ढोल, ताशा, झांज ,लेझीम पथकासह घोषणा देत प्रभात फेरी संपन्न करण्यात आली. या प्रभात फेरीमध्ये गाडगेबाबांची प्रतिकृती बनवून स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी झाला होता त्यामुळे दिंडीमध्ये गाडगेबाबा हे आकर्षण ठरले. स्वच्छतेचा संदेश देत घोषणा देत अतिशय उत्साहात दिंडी संपन्न झाली गावातील महिला भगिनींनी ठिकाणी गाडगेबाबांचे पूजन करून अभिवादन केले. दिंडीच्या समोर प्रसंगी गाव स्वच्छ ठेवण्याच्या आश्वासन ग्रामस्थांनी दिले.
८) शिबिराचे उद्घाटन: शिबिराचे उद्घाटन शनिवार दिनांक १४ जानेवारी२०२४ रोजी सायंकाळी ४:०० ते५;३० या वेळेत संपन्न झाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.कैलास दुधाळे, जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार श्रीमती कविता गोरे, जनता शिक्षण संस्थेचे ग्रामीण सदस्य श्री. बाळासाहेब पोळ, गावचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील ,ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष , सोसायटी सदस्य,व इतर ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.
९) शिबिराचा समारोप समारंभ: शनिवार दिनांक २० जानेवारी २0२४रोजी सकाळी ९:३० ते ११३० या वेळेत “शिबिराचा समारोप” समारंभ अतिशय उत्साह संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी जनता शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. महेश आगम गावचे सरपंच, वैभव गावडे, उपसरपंच चंद्रकांत गाडगे, शाळा समिती अध्यक्ष ज्योतीताई गावडे, विठ्ठल पंत दौंडकर, फुलचंद महाराज सरडे,पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष ,ग्रामपंचायत सदस्य, व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या वतीने शिबिर अतिशय सुंदर झाल्यामुळे शिबिरार्थींना “स्मृतीचिन्ह” देऊन सन्मानित करण्यात आले त्याचप्रमाणे शाळा समितीचे अध्यक्ष सौ कविताताई गाडगे यांच्याकडून प्रत्येक गटप्रमुखांना “स्मृतीचिन्ह” देऊन सन्मानित करण्यात आले.
शिबिराच्या समारोप कार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी शिबिरार्थींना स्वादिष्ट भोजन देऊन स्वतः वाढण्याचे काम केले.
शिबिराचे संयोजन: सी.के गोयल कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुभाष सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे प्रा. सिद्धार्थ कांबळे प्रा.वैभव वरडुले,प्रा. उत्तम गोरड प्रा. अक्षदा पानसरे ,प्रा. शीला येलमेळी यांनी केले.
त्यांना विद्यार्थी प्रतिनिधी कपिल कांबळे, जायराज मोरे, धीरज ससाने ,काजल काटे, रत्नप्रभा मोरे, व सर्व गटप्रमुखांनी सहकार्य केले.
