Pune Congress Gandhigiri | पेट्रोल डिझेल दरवाढ, लूट विरोधातील काँग्रेसच्या सलाम पुणेकर गांधीगिरी आंदोलनाची सांगता

HomeBreaking News

Pune Congress Gandhigiri | पेट्रोल डिझेल दरवाढ, लूट विरोधातील काँग्रेसच्या सलाम पुणेकर गांधीगिरी आंदोलनाची सांगता

Ganesh Kumar Mule Oct 14, 2024 8:58 PM

Lad Page Committee | कंत्राटी कामगारांचा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा 
Chandni Chowk pune | चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी ५ मिळकतींचे भूसंपादन
World Environment Day | भारती विद्याभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण करण्याची  घेतली शपथ

Pune Congress Gandhigiri | पेट्रोल डिझेल दरवाढ, लूट विरोधातील काँग्रेसच्या सलाम पुणेकर गांधीगिरी आंदोलनाची सांगता

| पुणेकरांचा भरघोस पाठींबा – माजी आमदार मोहन जोशी

 

Mohan Joshi Pune Congress – (The Karbhari News Service) – पेट्रोल आणि डिझेल दर वाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने केलेल्या सलाम पुणेकर गांधीगिरी आंदोलन सप्ताहाची सांगता करण्यात आली.या सप्ताहात पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला,अशी माहिती सप्ताहाचे संयोजक,प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी आज सोमवारी दिली. (Pune News)

आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे भाव उतरले तरी त्याचा फायदा ग्राहकाला न देता मोदी सरकार आणि तेल कंपन्यांनी नफेखोरी करून ३०लाख कोटींची लूट केली.याचा निषेध नोंदविण्यासाठी गांधीगिरी आंदोलन करण्यात आले.शहरातील विधानसभेच्या सहा मतदार संघात मुख्य पेट्रोल पंपावर वाहन चालकांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाबाचे फूल आणि इंधन दरपत्रक भेट दिले.त्यावेळी नागरिकांनी प्रतिसाद दिला.महात्मा गांधी जयंती निमित्ताने गांधीगिरी मार्गाने दि.३ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या आंदोलनाची सांगता आज सोमवारी करण्यात आली. यापुढेही पेट्रोल डिझेल दर कमी होई पर्यंत काँग्रेस विविध मार्गाने आंदोलन करून दबाव वाढवत राहील असे मोहन जोशी यांनी सांगितले.

सामान्य ग्राहकाची लूट होत आहे हा मुद्दा लोकांना पटला.महागाई वाढते आहे अशावेळी पेट्रोल डिझेलचे दर ३० रुपयांनी कमी करून मोदी सरकारने दिलासा द्यायला हवा होता असे अभिप्राय देवून लोकांनी सरकारविषयी नाराजी व्यक्त केली ,असे मोहन जोशी यांनी सांगितले.

या सप्ताहात माजी मंत्री रमेश बागवे, चंद्रशेखर कपोते, रामदास मारणे,रमेश अय्यर, प्रशांत सुरसे,सुनील मलके, बंडू नलावडे,प्रथमेश आबनावे,शाबिर खान,अयुब पठाण,प्रवीण करपे,किशोर मारणे,सुरेश कांबळे,चेतन आगरवाल,संकेत गलांडे,स्वाती शिंदे प्राची दुधाने,अनिता मकवाना,सुलभा क्षीरसागर,राज जाधव, जयकुमार ठोंबरे, ऍड.निलेश बोराटे,फैयाज शेख,ज्योती चंदेलवाल,प्रशांत वेलणकर,चंद्रकांत चव्हाण,राजेंद्र मगर,नरेश धोत्रे आदी सहभागी झाले होते.