Pune Congress Agitation | काँग्रेसच्या गांधीगिरी आंदोलनाला प्रारंभ  | पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

HomeBreaking News

Pune Congress Agitation | काँग्रेसच्या गांधीगिरी आंदोलनाला प्रारंभ | पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

Ganesh Kumar Mule Oct 03, 2024 6:15 PM

Congress | Fuel price hike | हात गाडीवर पेट्रोल डिझेलचे बॅरल ठेवून इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन
Yuvasena : Cycle Rally :इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्यावतीने राज्यव्यापी ‘सायकल रॅली’चे आयोजन
Yuvasena : इंधन दरवाढी निषेधार्थ युवा सेने काढलेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद 

Pune Congress Agitation | काँग्रेसच्या गांधीगिरी आंदोलनाला प्रारंभ  | पुणेकरांचा मोठा प्रतिसाद

 

Mohan Joshi Pune – (The Karbhari News Service) – पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या, पेट्रोलची दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम या गांधीगिरी आंदोलन सप्ताहाला पहिल्याच दिवशी आज (गुरुवारी) पुणेकरांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली. (Pune News)

महात्मा गांधी यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करून ब्रिटिश सरकारला येथून घालविले. आपणही गांधीजींच्या मार्गानेच आंदोलन करून मोदी सरकारला भाग पाडू, असे मोहन जोशी यांनी आंदोलकांसमोर बोलताना सांगितले.

गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ३२.५ टक्क्यांनी घसरल्या. परिणामी देशातील पेट्रोल आणि डिझेल च्या किमती लिटरमागे २०ते२५ रूपयांनी कमी व्हायला हव्या होत्या. परन्तु, तसे झाले नाही. तेल कंपन्या आणि मोदी सरकारने देशातील जनतेची सुमारे ३५लाख कोटी रूपयांची लूट केली. त्या लुटीचा जाब जनतेनी मोदी सरकारला विचारायला हवा, असे आंदोलकांसमोर बोलताना रमेश बागवे यांनी सांगितले.

गांधीगिरी आंदोलन सप्ताहाचा प्रारंभ लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप येथे सकाळी ११ वाजता करण्यात आला. ‘पेट्रोल दरवाढ सहन करणाऱ्या पुणेकरांना सलाम’, ‘तेल कंपन्या-मोदी सरकार झाले मालामाल, जनता झाली बेहाल’, पेट्रोलची झाली दरवाढ, मोदी सरकार करते ग्राहकांची लूट’ अशा घोषणा लिहीलेले फलक हातात घेऊन कार्यकर्ते उभे राहिले होते. पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना पेट्रोल चे दर पत्रक आणि एक गुलाबाचे फूल भेट देण्यात आले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि सप्ताहाचे संयोजक, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, सुनील मलके, रमेश अय्यर, प्रथमेश आबनावे, ॲड.शाबीर खान, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, सुरेश कांबळे, चेतन अगरवाल, स्वाती शिंदे, प्राची दुधाने, मोनिका कलाने, अनिता मकवाना, आयुब पठाण, रोहन सुरवसे, प्रविण करपे, महेश अराळे, खंडू लोंढै, बाळासाहेब मारणे, किशोर मारणे, समीर गांधी, अनील आहेर, विनोद रणपिसे, रामदास मारणे, डॉ. अनुप बेदी, दत्ता डुरे, गोरख पळसकर, उमेश कांची, अनिकेत सोनवणे, साजीद शेख, सुरेश नांगरे, प्रथमेश लबडे, अक्षय सोनवणे, नरेश धोत्रे, साहील राऊत, चिलेश मोता, दिलीप लोळगे, किरण म्हात्रे, रोहन थोरात, अथर्व सोनार, किशोर वाघेला, राजाभाऊ नखाते, शोभा परभाने, सविता माळवे, ममता नेरळ, आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

पेट्रोल दरवाढीच्या विरोधातील या आंदोलनाला पुणेकरांचा प्रतिसाद मिळाला, विधानसभेच्या आठही मतदारसंघात हे आंदोलन होईल, त्यालाही पुणेकर चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0