Pune City Traffic | पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी  | नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्ताचे आवाहन

Homeadministrative

Pune City Traffic | पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी | नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्ताचे आवाहन

Ganesh Kumar Mule Jan 14, 2025 10:08 PM

NCP Youth | छत्रपतीं संदर्भातील वक्तव्यावरून युवक राष्ट्रवादीची कोथरूड मध्ये राज्यपालांच्या विरोधात बॅनरबाजी
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून स्वच्छतेबाबत आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना  प्रशिक्षण देण्यास सुरुवात 
Holidays in New Year | PMC Pune | आगामी वर्षासाठी (2023) महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

Pune City Traffic | पुणे शहरात वाहतूक बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी

| नागरिकांनी सहकार्य करण्याचे वाहतूक पोलीस उपायुक्ताचे आवाहन

 

Ganeshkhind Road – (The Karbhari News Service) – गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरू असून वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपात बदलाबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उप आयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहे. (Pune City Traffic Police)

बाणेर कडुन शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक :- बाणेरकडून येणारी वाहतुक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चर मधून युटर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगर इच्छितस्थळी जातील.

शिवाजीनगरकडून औंध कडे जाणारी वाहतुक:- शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंधरोड मार्गे इच्छितस्थळी जातील.

औंधकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतुक:- औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतुक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन- विदयापीठ मुख्य प्रवेशव्दारातून बाहेरपडून इच्छितस्थळी जातील.

नागरीकांनी वाहतूक बदल मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. झेंडे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0