Cantonment Vidhansabha Election | सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची साथ महायुतील मिळेल; सुनील कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास  | पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीची मातृशक्तीची महाबैठक संपन्न

HomePolitical

Cantonment Vidhansabha Election | सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची साथ महायुतील मिळेल; सुनील कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास | पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीची मातृशक्तीची महाबैठक संपन्न

Ganesh Kumar Mule Nov 07, 2024 6:34 PM

MLA Sunil Kamble | आमदार सुनील कांबळे यांच्या प्रयातनातून सुटला 40 वर्षा पासून रखडलेल्या  वाहतूक कोंडीचा प्रश्न !
Pune Congress | भाजप आमदार सुनिल कांबळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, आमदार माधुरी मिसाळ यांचे बंधू मनोज देशपांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी – अरविंद शिंदे
MLA Sunil Kamble welcomed the state government’s decision about Police Earned Leave

Pune Cantonment Vidhansabha Election | सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची साथ महायुतील मिळेल; सुनील कांबळे यांनी व्यक्त केला विश्वास

| पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीची मातृशक्तीची महाबैठक संपन्न

 

MLA Sunil Kamble – (The Karbhari News Service) –  राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रमाने काम हाती घेण्यात आले होते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलेंडर, महिला बचत गटांना अर्थसाहाय्य यामुळे सर्वसामान्य महिलांचे जीवनमान उंचावण्यासा मदत झालेली आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा विरोधकांचा डाव आहे, यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिला महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहतील असा विश्वास पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदार संघातील भाजप, महायुतीचे उमेदवार आमदार सुनील कांबळे यांनी व्यक्त केला. (Pune News)

भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआय (ए) व मित्रपक्षांचा महायुतीच्या महिला भगिनींची मातृशक्तीची महाबैठक सोमवार पेठेतील जनसागर हॉल सोमवार पेठे येथे पार पडली. याप्रसंगी बैठकीस भाजपा पुणे शहर महिला अध्यक्षा देवयानी फरांदे, माजी नगरसेविका कालिंदा पुंडे, मंगला मंत्री, मनिषा लडकत, सरचिटणीस उज्वला  गौड, भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेच्या अध्यक्षा प्रियांका श्रीगिरी, उपाध्यक्षा माधुरी गिरमकर, पल्लवी केदारी, वैशाली सोनवणे, सुवर्णा  भरेकर, मनिषा सोनवणे आणि इतर भगिनी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

पुढे बोलताना सुनील कांबळे म्हणाले,  मागील 5 वर्षात मी लोकांची कामे केली आहेत, लोकांना माहीत आहे मी कामे करणारा माणूस आहे, यामुळे 50 हजार मतांच्या फरकाने विजयी होण्याचा मला विश्वास वाटतो.  कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून पुणे कॅंटॉन्मेंट विधानसभा मतदारसंघात 37 हजारांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, ही सर्व कुटुंब माझ्या सोबतीला असतील यात शंका नाही. तसेच  कोविडच्या काळात सर्वसामान्य माणसाला अनेक अडचणी येत होत्या हे लक्षात घेऊन मी आणि माझ्या टीमने सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले,  महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली, आज विरोधक फेक नरेटीव्ह पसरवत आहेत मात्र सामान्य मतदार त्यांना मतदानातून योग्य उत्तर देतील याची मला खात्री वाटते.