Pune Bhide Wada Smarak  News |  भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होण्याचा मार्ग मोकळा !    | स्मारक खटल्याचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने

HomeBreaking Newsपुणे

Pune Bhide Wada Smarak News | भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होण्याचा मार्ग मोकळा ! | स्मारक खटल्याचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने

Ganesh Kumar Mule Oct 16, 2023 12:34 PM

Bhide Wada | भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची महाधिवक्त्यांना विनंती
BJP Pune | Bhide Wada Smarak | ऐतिहासिक भिडे वाड्याचे रुपांतर लवकरच राष्ट्रीय स्मारकात होणार, भाजपाकडून साखर वाटून आनंदोत्सव
Phule Smarak Pune | महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकांच्या विकास आराखड्यांचा  आढावा

Pune Bhide Wada Smarak  News |  भिडेवाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात होण्याचा मार्ग मोकळा !

| स्मारक खटल्याचा निकाल पुणे महापालिकेच्या बाजूने

Pune Bhide Wada Smarak News | देशातील मुलींची पहिली शाळा पुण्यातील ज्या वाड्यात सुरु झाली तो भिडेवाडा (Bhide Wada Pune) लवकरच राष्ट्रीय स्मारक (National Memorial) होणार आहे. 2006 सालापासून हा खटला उच्च न्यायालयाच्या (high  Court) प्रक्रियेत अडकला होता. अखेर हा प्रश्न निकाली लागला आहे. भिडेवाड्या संदर्भात उच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) बाजूने लागला आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणाचे स्मारकात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली. (Pune Bhide Wada Smarak News)

2006 साली महापालिकेने केला होता ठराव

भिडे वाड्याचे रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याबाबतचा ठराव महापालिका मुख्य सभा (PMC General Body) तत्कालीन शिक्षण मंडळाने 2006 साली पारित केला होता. मात्र तेथील काही भाडेकरूंनी महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. याबाबत आज अंतिम सुनावणी झाली. न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे निशा चव्हाण यांनी सांगितले. (Bhide Wada National Memorial)

 चंद्रकांत पाटील यांनी पुणेकरांचे केले अभिनंदन 

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत पुणेकरांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले. पुणेकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मुलींची पहिली शाळा म्हणजे भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी पालकमंत्री या नात्याने मी सातत्याने प्रयत्नशील होतो. शासनाकडून निधीची तरतूद झाल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांची भेट घेतली होती. या भेटीत मी  भिडेवाड्यासंदर्भातील शासनाच्या भूमिकेसंदर्भात माहिती दिली होती. तसेच, उच्च न्यायालयात यासंदर्भात शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंतीही केली होती. त्यानुसार महाधिवक्त्यांनी उच्च न्यायालयात शासनाची प्रभावी भूमिका मांडल्याने उच्च न्यायालयाने ही भिडेवाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. लवकरच आता भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर होईल, याबद्दल सर्व पुणेकरांचे अभिनंदन, असे चंद्रकांत पाटील यांनी  म्हटले आहे.

– विविध राजकीय पक्षाकडून जल्लोष

दरम्यान या निर्णयाचे शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, भारतीय जनता पार्टी अशा पक्षाकडून सायंकाळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

——

News Title | Pune Bhide Wada Smarak News | Paving the way for Bhidewada to be converted into a national monument! The verdict of the memorial case is in favor of the Pune Municipal Corporation