Pune Airport | पुणे विमानतळाला ‘स्लॉट वाढीचा’ बूस्टर | हवाई वाहतुकीत वाढीसाठी मोकळा मार्ग

HomeBreaking News

Pune Airport | पुणे विमानतळाला ‘स्लॉट वाढीचा’ बूस्टर | हवाई वाहतुकीत वाढीसाठी मोकळा मार्ग

Ganesh Kumar Mule May 31, 2025 9:16 PM

PMC Pune Recruitment Update | पुणे महापालिकेत दुसऱ्या टप्प्यातील भरती देखील लवकरच! | महापालिका प्रशासनाने सुरु केली पूर्वतयारी
Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवात नागरिकांना पुस्तकांच्या खरेदीवर १०० रुपये सवलत|  सोसायटीमध्ये वाचनालयासाठी १००० रुपयांची सवलत
Palkhi sohala 2023 Marathi news | पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे |  जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

Pune Airport | पुणे विमानतळाला ‘स्लॉट वाढीचा’ बूस्टर | हवाई वाहतुकीत वाढीसाठी मोकळा मार्ग

 

Muralidhar Mohol – (The Karbhari News Service) – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उड्डाण स्लॉटमध्ये १५ ने वाढ करण्यात आली असून त्यामुळे येत्या काळात विमानांची संख्या वाढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत २२० स्लॉट उपलब्ध होते. आता वाढलेल्या स्लॉटसह एकूण संख्येचा आकडा २३५ वर पोहोचला आहे. यामुळे विमानांची संख्या वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Pune News)

विमान कंपन्यांची आणि प्रवाशांची पुणे विमानतळाला असणारी वाढती मागणी लक्षात घेता, अधिकचे स्लॉट उपलब्ध होणे आवश्यक होते. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हवाई दलाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यावरूनच हवाई दलाचे एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी स्लॉट वाढवल्याचे पत्र पाठवले आहे. सकाळी ६ ते रात्री १०ः२९ या वेळेत हे स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुणेकरांना अधिक फ्लाइट्स, विविध गंतव्ये आणि उड्डाणांच्या वेळांमध्ये लवचिकता मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे विमानतळाच्या क्षमतेचा प्रश्न सातत्याने चर्चा होत होती. शहराची औद्योगिक, आयटी आणि शैक्षणिक वाढ लक्षात घेता, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी मागणी वाढली आहे. स्लॉट वाढल्यामुळे नवीन फ्लाइट्ससाठी संधी उपलब्ध होणार असून, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबादसह काही नव्या शहरांशी थेट कनेक्टिव्हिटी अपेक्षित आहे. स्लॉट ढीमुळे विमान कंपन्यांना सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळांमध्येही फ्लाइट्स सुरु करण्याची अधिक संधी मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या वेळेनुसार पर्याय मिळतील, तर कंपन्यांना अधिक महसूल संधी उपलब्ध होतील.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ वेगाने करण्याचा आमचा प्रयत्न आहेच, मात्र पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विविध पातळ्यांवर सक्षमीकरणालाही आमचे प्राधान्य आहे. याचाच भाग म्हणून विमानांची संख्या वाढविण्यासाठी अधिकचे स्लॅाट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. ज्याला यश आले असून आता उपलब्ध स्लॉटची संख्या २३५ वर गेली आहे. यामुळे विमानांच्या फेऱ्यांची संख्या वाढणार असून पुण्याची हवाई कनेक्टिव्हीटी आणखी मजबूत होणार आहे.’

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: