Pune Air Quality Index | पुणे महापालिकेच्या उप अभियंता, साईट इंजिनिअर, कार्यकारी अभियंता यांच्यासाठी हवा प्रदूषणा बाबत कार्यशाळा

PMC Building

HomeBreaking News

Pune Air Quality Index | पुणे महापालिकेच्या उप अभियंता, साईट इंजिनिअर, कार्यकारी अभियंता यांच्यासाठी हवा प्रदूषणा बाबत कार्यशाळा

Ganesh Kumar Mule Aug 21, 2024 12:00 PM

Dry Mist Based Fountain System | पुणे महापालिकेत नुकतीच उदघाटन केलेली ड्राय मिस्ट बेस्ड फाऊंटन सिस्टीम काय आहे?
Pune Air Quality Index | शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र शासनाकडून पुणे महापालिकेला आतापर्यंत मिळाले 162 कोटी!
PMC Solid Waste Management Bylaws | हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या बावधन मधील मार्बल मार्केट कंपनी वर महापालिकेची कारवाई 

Pune Air Quality Index | पुणे महापालिकेच्या उप अभियंता, साईट इंजिनिअर, कार्यकारी अभियंता यांच्यासाठी हवा प्रदूषणा बाबत कार्यशाळा

 

 

Pune Air Pollution – (The Karbhari News Service) – पुणे शहरातील हवा प्रदूषण (Pune Air Pollution) कमी करण्यासाठी बांधकामांमुळे तयार होणाऱ्या धूलीकणांवर नियंत्रण आणणेबाबत २२ ऑगस्ट (गुरुवार) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पुणे महापालिकेच्या (PMC Engineer) उप अभियंता, साईट इंजिनिअर, कार्यकारी अभियंता यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे. याबाबतचे आदेश उपायुक्त संजय शिंदे (Sanjay Shinde PMC) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation- PMC)

पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सुधारणेसाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे. शहरातील AQI-Air Quality Index कमी होण्याचे कारणांपैकी हवेतील धुलीकण महत्वाचा घटक आहे. हे धुलीकण (PM10) कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे निर्देश देण्यात आले होते. पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागाकडील पुणे शहरांमध्ये सुरु असलेली कामे, अशा सर्व कामांपासून धूळ उडू नये म्हणून राडा रोड्यावर तसेच मटेरियल लोडिंग / अनलोडिंग करताना पाण्याचे Sprinkling/Spraying करणे, बांधकामाच्या राडा रोड्याची विल्हेवाट व्यवस्थित करणे, बांधकाम साहित्याला बॅरीकेडिंग करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

WRI – World Resources Institute समवेत पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत
Towards Clean Construction Capacity Building Program for Dust Mitigation at
Construction या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

दि. २२ ऑगस्ट २०२४
वेळ :- सकाळी ११:०० ते दु. ०२:३० पर्यंत
ठिकाण :- पंडित जवाहरलाल नेहरू ऑडीटोरीयम घोले रोड, पुणे.

त्यासाठी शहर अभियंता, पथ, क्षेत्रीय कार्यालये, घनकचरा, प्रकल्प, अशाविभागाकडील साईट इंजिनीअर, उप अभियंता, कार्यकारी अभियंता यांना कार्यशाळेस उपस्थित राहणेस सांगण्यात आले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0