Pune Air Quality index | पुण्याच्या हवेची गुणवत्ता रोजच्या रोज महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करा
| विवेक वेलणकर यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी
Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोट्यवधी रुपये खर्च करून पुणे महापालिका (Pune Municipal Corporation – PMC) हद्दीत स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission) तर्फे बसवण्यात आलेल्या ४५ Air quality index sensors मधून उपलब्ध माहिती रोजच्या रोज महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करावी. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipa Corporation News)
वेलणकर यांच्या निवेदनानुसार वायू प्रदूषणात पुणे शहराचा क्रमांक संपूर्ण भारतात फार वर आहे. यातून नागरीकांच्या आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. पुण्यातील हवेची गुणवत्ता वेगवेगळ्या ठिकाणी काय आहे याचा वेध घेण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून Air quality sensors बसवण्यात आले आहेत. वैकुंठ स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होते अशा तक्रारी असल्याने वैकुंठापासून एक किलोमीटर परिसरात रहिवाशांच्या इमारतीवर पुणे स्मार्ट सिटी तर्फे दोन AQI sensors बसवण्यात आले आहेत. आता स्मार्ट सिटी कडील सर्वच यंत्रणा पुणे महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे.
त्यामुळे हे Air quality sensors महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ताब्यात आले आहेत. मी गेल्या एक महिन्यापासून या Air quality sensors मधून उपलब्ध होणारा डाटा मला मिळावा तसेच तो महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा यासाठी प्रयत्नशील आहे , पण जून २०२४ पर्यंत चीच माहिती उपलब्ध झाली आहे असे आज सांगण्यात आले.
नागरीकांच्या करांच्या कोट्यवधी रुपयांतून ही यंत्रणा बसवली गेली असतानाही ही माहिती अद्ययावत का ठेवली जात नाही हे कोडे उलगडत नाही. एकीकडे पुणे महापालिका हवेची गुणवत्ता ढासळल्याने बांधकामांवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे शहरांतील विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता काय आहे ही माहिती रोजच्या रोज ठेवली जात नाही. महापालिका, वाहतूक पोलीस, नागरीक यांना ही माहिती रोजच्या रोज उपलब्ध झाली तर काही उपाययोजना करणे शक्य होईल.
आमची आग्रहाची मागणी आहे की या Air quality sensors द्वारा गोळा केल्या गेलेल्या माहितीचे रिपोर्ट्स रोजच्या रोज पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. असेही वेलणकर यांनी म्हटले आहे.
COMMENTS