Pune Air Pollution | बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर – आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करा | पुणे महापालिकेच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना 

Homeadministrative

Pune Air Pollution | बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर – आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करा | पुणे महापालिकेच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना 

Ganesh Kumar Mule Aug 27, 2025 8:09 PM

Shivaji Maharaj Jayanti | शिवाजी महाराजांच्या शिल्प आणि पुतळा दुरुस्ती बाबत मुख्य सभेत चर्चा 
Enhanced Pension Coverage | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा|  आता 4 महिन्यांत तुम्ही निवडू शकता वाढीव पेन्शनचा पर्याय
PMPML | BRTS | पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली  | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय 

Pune Air Pollution | बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर – आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करा | पुणे महापालिकेच्या बांधकाम व्यावसायिकांना सूचना

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. (Prithviraj B P IAS) यांनी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व संबंधितांच्या सूचना व शिफारसींचा समावेश करण्यासाठी Task Force Committee स्थापन करून बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर – आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारून केंद्रीकृत डॅशबोर्डशी एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या. या प्रणालीच्या साहाय्याने वास्तविक-वेळेतील (real-time) माहिती उपलब्ध होईल आणि धूळ व वायू प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करता येईल. असे अतिरिक्त आयुक्त यांनी सांगितले. (PMC  Environment Department)

राज्यातील अनेक शहरांमध्ये पी.एम २.५ आणि पी. एम. १० या धुलीकणांमुळे वायू प्रदूषण वाढत असल्याने राज्य सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, यांच्या दि. २/११/२०२३ रोजी पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६, कलम ५ अन्वये देण्यात आलेल्या निर्देशानुसार बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणे आवश्यक आहे. प्रदूषणाची पातळी निर्देशित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होते तेव्हा त्यास नियंत्रित करण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व बांधकाम परवाना विभाग आणि डब्ल्यू. आर. आय. इंडिया (WRI India) यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यन्वित करण्याकरिता चर्चा करण्यासाठी क्रेडाई (CREDAI), मराठी बांधकाम व्यावसायिक, नारेडको आणि सेन्सर उत्पादक यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.

वायू प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या कमी करण्याकरिता बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी सेन्सर-आधारित वायू गुणवत्ता तपासणीसाठी प्रणाली उभारणेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या दिलेल्या निर्देशानुसार बैठकी दरम्यान संतोष वारूळे, उपआयुक्त, पर्यावरण विभाग यांनी प्रास्ताविक केले. डब्ल्यूआरआय इंडियाचे संचालक श्रीकुमार कुमारस्वामी यांनी सेन्सर आधारित वायू गुणवत्ता तपासणी प्रणालीबाबत सादरीकरण केले.

बैठकीदरम्यान शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी पुणे शहर हे राहण्यायोग्य शहर (livable city) आहे परंतु सद्यस्थितीत बांधकाम सेक्टर तसेच रोड डस्टचे प्रमाण अधिक आहे यामुळे बांधकाम व्यावसायिक यांनी तातडीने बांधकामाचे मोठे प्रोजेक्ट्स या ठिकाणी सेन्सर आधारीत वायू गुणवत्ता तपासणी प्रणाली कार्यान्वित करावी असे आवाहन केले.

 

ही बैठक पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पर्यावरण विभागाचे उप आयुक्त संतोष वारुळे, अधिक्षक अभियंता राजेश बनकर तसेच बांधकाम परवाना विभागातील अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीस डब्ल्यूआरआय इंडिया, क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक असोसिएशन, नारेडको संस्थेचे प्रतिनिधी आणि सेन्सर उत्पादक उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0