सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या संचाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन
पॉप्युलर प्रकाशनातर्फे ज्येष्ठ नाटककार आणि रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या नऊ नाटकांच्या नव्या आवृत्त्यांच्या संचाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक रा. भालचंद्र नेमाडे यांचे हस्ते पु.ल.देशपांडे कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सतीश आळेकर यांनी त्यांच्या ठकीशी गप्पा, या नवीन नाटकाचे अभिवाचन केले.
आळेकर यांच्या बेगम बर्वे, आधारित एकांकिका, अतिरेक, दुसरा सामना, महानिर्वाण, महापूर, पिढीजात/ मिकी आणि मेमसाहेब, शनिवार रविवार, झुलता पूल आणि इतर एकांकिका या पॉप्युलर प्रकाशित ९ नाटकांचा संचाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जब्बार पटेल,कुमार केतकर, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीरंग गोडबोले, वंदना गुप्ते, विजय केंकरे, मीना नाईक, अशोक शहाणे, रेखा शहाणे, नीरजा असे अनेक मान्यवर उपस्थित होते.
नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, पद्मश्री सतीश आळेकर सर यांना नाट्यक्षेत्रातील अत्यंत मानाचा विष्णूदास भावे पुरस्कार नुकताच जाहीर झाला. तसेच महाराष्ट्र शासनाकडूम नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे.