महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करणाऱ्या सूर्याजी पिसाळ उर्फ भगतसिंह कोश्यारी यांचा जाहिर निषेध | अरविंद शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ ज्ञानेश्र्वर महाराज यांच्या आशिर्वादाने पावन झालेली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारीत ही पावन भूमी असून १०८ हुतात्म्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या बलिदानानंतर उभी राहिलेली ही भूमी याचा अपमान राज्याचे बाहेरून आलेले राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी आपल्या भाजपा प्रेमापोटी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. याचा मी सर्वप्रथम निषेध करतो. असे पुणे शहर कॉंग्रेस चे प्रभारी अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले, ‘‘गुजराती व राजस्थानमधील व्यापारी लोकांमुळे मुंबई महाराष्ट्र आहे जर ते नसते तर ही राजधानी आर्थिक राजधानी सुध्दा राहिली नसती.’’ अशा पध्दतीचे वक्तव्य हे निषेधार्य आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून मुंबईमध्ये गुजराती, राजस्थानी अनेक राज्यांतून आलेल्या सर्वांचे मराठी माणसाने मनमोकळ्या पणाने व मोठ्या मनाने स्वागत केले आहे. भाजपाचे राज्यपाल फक्त मतांचे द्रुवीकरण करण्यासाठी असे वक्तव्य करतात याचे आश्चर्य तर वाटतेच परंतु भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील एकाही नेत्याला वाईट वाटू नये याची खंत आहे आणि याबद्दल येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता तुम्हाला जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०८ हुतात्म्यांवर कोणी गोळी चालविण्यास लावली हे महाराष्ट्र विसरलेले नाही.
भाजपाचे राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध वास्तविक पाहता मुंबईमध्ये राहणाऱ्या गुजराती व राजस्थानी व्यापाऱ्यांनी करायला पाहिजे कारण अनेक राज्यातून आलेल्या लोकांना मराठी माणासांनी साथ दिली नसती तर तेही व्यापारी मोठे झाले नसते. खर तर गुजराथी संघटनांनी व राजस्थानी संघटनांनी या वक्तव्याचे खंडण आगोदर केले पाहिजे. असे ही शिंदे म्हणाले.