मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन!
| शिवसेना (ठाकरे गट) करणार आंदोलन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या विरोधात पुण्यात उद्या आंदोलन (Agitation) करण्यात येणार आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्या वतीने हे आंदोलन सकाळी 11.00 वा. छ संभाजी महाराज पोलीस चौकी, अलका टॉकीज चौक, येथे हे आंदोलन होईल. अशी माहिती शहर प्रमुख संजय मोरे यांनी दिली. Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)
मोरे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात भूखंडाच्या विषयावरून मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला, परंतू जुने पुराणे विषय काढून हे अधिवेशन भरकटवल जातय. भूखंडाचे श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.