पुणे महापालिकेच्या कॅन्सर तपासणी शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
पुणे | पुणे महापालिका आरोग्य विभागाकडून आयोजित कॅन्सर तपासणी शिबिरामध्ये पुणे महानगरपालिकेमधील महिला सेविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन १०० महिला सेविकांच्या General Examination, BSL(R), B.P तपासण्या व ५० महिला सेविकांच्या PAP Smear करण्यात आले. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.
पुणे महानगरपालिका वर्धापनदिना निमित्त पुणे महानगरपालिका व इंद्रायणी हॉस्पिटल अॅण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट आळंदी, पुणे यांचे समन्वयाने दि. १४ रोजी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत कार्यरत महिला सेविकांसाठी कॅन्सर या आजाराबाबत जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन जुना जी.बी. हॉल मुख्य इमारत आरोग्य कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन श्री. रवींद्र बिनवडे मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात डॉ. आशिष भारती आरोग्य प्रमुख, सर्व सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा नाईक अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना, डॉ. वैशाली जाधव, डॉ.कल्पना बळीवंत, डॉ. संजीव वावरे, डॉ.नागमोडे, डॉ. सुर्यकांत देवकर, डॉ. प्रल्हाद पाटील वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी व सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना विभाग तसेच इंद्रायणी हॉस्पिटल ॲण्ड कॅन्सर इन्स्टिट्यूट यांचेमार्फत डॉ. शैलेश नाईक, डॉ. मंजिरी जोशी, अनिल पत्की, ज्योती काकडे हे उपस्थित होते.
सदर शिबिरामध्ये डॉ. मंजिरी जोशी यांनी कॅन्सर या आजाराबाबत उपस्थित ३०० महिलांना माहिती दिली तसेच स्तनाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सर विषयी आढळणारी लक्षणे, खुणा, त्याबाबत घ्यावयाची काळजी व उपचारपद्धती याबाबत मार्गदर्शन केले.