Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | ज्ञानेश्वर जाधवर यांच्या ‘कूस’ कादंबरीला प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार
सामाजिक वेदना मांडणारी व मानवी जीवनमूल्य असणारी कादंबरी “कूस” | प्रा. मिलिंद जोशी
Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel | साहित्यात वाङमय मुल्यासोबत जीवनमूल्यनाचाही सहभाग असायला हवा. समाजाची वेदना मांडणारे साहित्याचं श्रेष्ठ असून सामाजिक अस्वस्थता मांडणारे साहित्य निर्माण होत आहे. आजचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर (Author Dnyaneshwar Jadhwar) हे समाजभिमुख आहेत. तर समाजाने देखील साहित्याभिमुख झाले पाहिजे. असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी (Working President of Maharashtra Sahitya Parishad Prof. Milind Joshi) यांनी रविवारी पुरस्कार वितरण कार्यक्रमात व्यक्त केलं. (Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel)
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस कादंबरीला प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. कूस कादंबरी ही महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार महिलांच्या व्यथा सोबत, एकूणच कामगारांच्या जगण्याचा मागोवा घेणारी आहे. (Koos Novel)
यावेळी बोलताना समीक्षक डॉ. प्रकाश सपकाळे कूस बद्दल म्हणाले, “कूस मध्ये वाङ्मयीन मूल्य , तंत्रमूल्य आणि जीवन मूल्य या तीनही मूल्यांचा समावेश आहे म्हणूनच आम्ही कूस कादंबरीची निवड केली आहे. कूस या कादंबरीत अलीकडंच शोषण कोणत्या पातळीवर होत आहे. मानवाच्या भाव भावनाच शोषण कसं होत आणि त्याच विकृतीकरण सध्या समाजात कसं पसरत आहे. निर्मित केंद्र , ऊर्जा केंद्र आहेत जी नष्ट करण्याच्या पाठीमागे हा समाज लागला आहे. म्हणजे स्त्रीच गर्भाशय काडून टाकण्यास इथली व्यवस्था कशी जबाबदार आहे, त्यात त्या बाईचा बळी जातोय, म्हणजे तिथं एक शोषण करणारी व्यवस्था आहे. तीच व्यवस्थाच जबादार आहे. हा शाश्वत व चिरंतन असणारा विषय लेखकाने बारकाईने मांडला आहे. कूस हि कादंबरी जिथे संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरु होते. दीर्घ काळ वाचकांच्या मनात रेंगाळणे हेच कूस या कादंबरीचं यश आहे.” (Author Dnyaneshwar Jadhwar)
डॉ. वासुदेव वले म्हणले की, “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील सरांनी ज्या पद्धतीने ज्ञानपरंपरा उभी केली आहे, त्या पद्धतीने ज्ञानाची चिकित्सा करणारे साहित्य समाजाला उपयुक्त ठरू शकते. तशा पद्धतीचा आशय आणि गाभा असणारी कूस कादंबरी आहे. म्हणून आम्हाला या कादंबरीचा गौरव यथोचित वाटतोय. लेखनाच्या पातळीवर सकासपणा असणारी आणि मानवी जगण्याचे अनेक कंगोरे मांडणारी ही कादंबरी आहे.”
वाचक नाना लामखेडे म्हणाले, “कूस मधील सुरेखा चा प्रवास वाचून अस्वस्थ वाटत आहे. आणि आपल्या आजूबाजूच्या व्यवस्थेचा तिटकारा वाटतोय कि आपण किती खालच्या पातळीवर येऊन जीवन जगत आहोत. लेखकाने अत्यन्त अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. सोबतच अनेक तपशील दिले आहेत. कूस ही कादंबरी वाचनिय तर आहेच पण विचार करण्यास भाग पडतेय त्यामुळे ही कादंबरी चिरंतन टिकून राहील.”
डॉ अशोक कोळी म्हणाले , “ कूस ही कादंबरी मराठी साहित्यात महत्वाची आहे कारण आजपर्यंत साहित्यात असा परिघा बाहेरचा विषय आला नव्हता. त्यामुळे अशा मानवाचं जगणं समजून घेण्यासाठी कसू भविष्यात उपयोगी ठरेल.”
यावेळी लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी पुरस्कार मिळाल्या नंतर मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कूस ही फक्त एकट्या सुरेखा कुटेंची गोष्ट नाही तर ती एक प्रातिनिधीक पात्र आहे. आपल्या समाजातील तळातील स्त्रियांचं जगणं कसं रक्तानं माखलेलं आहे, त्याचा कथात्मक शोध कूस मध्ये घेतलेला आहे. कुटूंब सांभाळणारी स्त्री हीच आजच्या समाजाचा आधार आहे पण आज तिलाच संपवण्याच्या गोष्टी विकृतीपणे समाजात घडत आहेत. याची मांडणी कूस मध्ये केली आहे.”
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी वि. दा पिंगळे, प्रा .सपकाळे , प्राचार्य डॉ. ए. आर पाटील, शोभा पाटील, प्रतिमा पाटील, ममता पाटील, डॉ. स्वाती विसपुते , डॉ. संगीता गावंडे, डॉ. आशिष महाजन , स्नेहल पाटील, गणेश राऊत, प्रा. पुरुषोत्तम महाजन , नामदेव पाटोळे , प्रा. विजयेंद्र पाटील आणि विलास मोरे उपस्थित होते.
News Title | Principal Dr. Kisanrao Patil State Level Literary Award to Dnyaneshwar Jadhawar’s ‘Koos’ novel.