Prasad Katkar PMC | बदली झालेले लिपिक टंकलेखक अजून बदली खात्यात हजर नाहीत | सामान्य प्रशासन विभागाने मागवला रुजू अहवाल
PMC GAD – (The Karbhari News Service) – पुणे मनपा आस्थापनेवरील नियतकालिक बदली झालेले लिपिक टंकलेखक अजून बदली खात्यात हजर झाले नाहीत. याबाबत आता सामान्य प्रशासन विभागाने ही बाब गंभीरपणे घेतली आहे. बदलीच्या खात्यामध्ये सेवक रुजू झाल्याचा अहवाल त्वरित आस्थापना विभागाकडे सादर करावा. असे आदेश उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation -PMC)
पुणे मनपा आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक पदावरील सेवकांच्या नियतकालिक बदली करण्यात आलेली आहे. बदली झालेल्या सेवकांनी १ जुलै रोजी प्रत्यक्ष बदली खात्यामध्ये रुजू व्हावे व बदलीच्या खात्यामध्ये रुजू झाल्याचा अहवाल ३ जुलै पर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावा असे आज्ञापत्रामध्ये नमूद आहे. परंतु असे निदर्शनास आले आहे कि अद्यापही काही सेवक हे बदली खात्यामध्ये हजर झाले नाहीत.
ही बाब अतिशय गंभीर असून सर्व खातेप्रमुखांनी बदली झालेल्या सेवकांना बदली खात्यामध्ये त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे तसेच बदलीच्या खात्यामध्ये सेवक रुजू झाल्याचा अहवाल त्वरित आस्थापना विभागाकडे सादर करावा. भविष्यात या बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास दोन्ही खात्याच्या संबधित अधिकारी यांना जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येईल. असा इशारा उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिला आहे.

COMMENTS