Pramod Nana Bhangire | शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा मदतीचा हात | एकनाथ शिंदे फाउंडेशन बाळासाठी ठरलं देवदूत..!!

HomeBreaking Newsपुणे

Pramod Nana Bhangire | शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा मदतीचा हात | एकनाथ शिंदे फाउंडेशन बाळासाठी ठरलं देवदूत..!!

Ganesh Kumar Mule Aug 22, 2023 11:15 AM

Sanitary Napkins in PM Schools | पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून पुणे महापालिका शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप 
Tamhini Ghat Bus Accident | ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक !
Pune City Shiv Sena and Eknath Shinde Foundation distributed sanitary napkins to students in PMC  School

Pramod Nana Bhangire | शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा मदतीचा हात | एकनाथ शिंदे फाउंडेशन बाळासाठी ठरलं देवदूत..!!

Pramod Nana Bhangire | पुणे | शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्या कडून राजकारणाच्या पलिकडे समाजकार्य होताना वेळोवेळी पाहायला मिळत आहे. अश्यातच पुण्यातील गायकवाड कुटुंबीयाला मदतीचं हात देत भानगिरे यांनी समाजाच्या समोर एक आदर्श निर्माण केला आहे. (Pramod Nana Bhangire)
शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्याकडे पुण्यातील मयूर दीपक गायकवाड हे त्यांच्या दहा महिन्याच्या बाळाला घेऊन आले होते.त्यांच्या बाळाला जेनेटिक डिसऑर्डर आजार झाल्याने त्यावर जे उपचार म्हणून इंजेक्शन मिळतात ते भारतात एकाच ठिकाणी मिळत आहे.व ते ही खूप महाग मिळत आहे.ही बाब त्याचे वडील मयूर दीपक गायकवाड यांनी लक्षात आणून दिल्यावर भानगिरे यांनी कोणत्याच शनाचा विलंब न करता आधीराज गायकवाड या दहा महिन्याच्या बाळाला दोन इंजेक्शन उपलब्ध करून देऊन समाजात एक आदर्श निर्माण करून दिलं आहे. (Eknath Shinde Foundation)
पुण्यातील मयुर गायकवाड यांच्या दहा महिन्याच्या बाळाला (नाव: आधिराज गायकवाड) वैद्यकीय उपचारासाठी इस्पितळात भरती केले असता बाळाला MPS Type 1 hurlar syndram
genetic disorder चे निदान डॉक्टरांनी केले, यात बाळाची कोणतीही शारीरिक वाढ होत नाही, त्याकरिता तातडीने दोन इंजेक्शन Injection – Aldurazyme 2.9mg ( laronidase)  देण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला, या दोन्ही इंजेक्शनची किंमत सुमारे एक लाख सहा हजार असून एकनाथ शिंदे फाउंडेशन व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने या दोन्ही इंजेक्शन चा संपूर्ण खर्च करण्यात येणार आला. आपल्या मदतीने जर कुणाचे प्राण वाचत असतील तर त्यापेक्षा मोठे सेवा समाधान नाही. हीच शिकवण लोकनेते एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे,बाळाची तब्येत लवकरात लवकर बरी होवो हीच प्रार्थना. अशी भावना भानगिरे यांनी यावेळी व्यक्त केली.