प्रधानमंत्री आवास योजनेस आणखी दोन वर्ष मुदतवाढ
केंद्र शासनाने 2022 पर्यंत सर्वांसाठी घरे देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2015 मध्ये सुरू केली. आता या योजनेस आणखी दोन वर्षे म्हणजे 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ही योजना पूर्ण होण्यासाठी कमी कालावधी असल्याने प्रधानमंत्री आवास योजनेस गती देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे.
या योजनेंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करणाच्या दृष्टीने तसेच त्यामध्ये एकसंघता व सुसुत्रता राहण्यासाठी आणली आहे. यामध्ये खासगी भागीदारी, पालिका अथवा पीएमआरडीएमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची तांत्रिक तपासणी करून या अहवालाच्या आधारेच निधी वितरणाचे प्रस्ताव पाठविले जाणार आहे.
काही प्रकल्पांमध्ये अनियमितता झाली असल्यास त्याची झळ लाभार्थ्यांना सोसावी लागते. तसेच प्रकल्प वर्षानुवर्षे रखडून लाभार्थ्यांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागते. या सर्व बाबींचा विचार करून म्हाडामध्ये स्वतंत्र तांत्रिक कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षामार्फत सर्व परवानग्या दिल्या जाणार आहेत.
COMMENTS