Pune Congress :  प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार : शहर अध्यक्ष रमेश बागवे

HomeपुणेPMC

Pune Congress :  प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार : शहर अध्यक्ष रमेश बागवे

Ganesh Kumar Mule Nov 14, 2021 12:49 PM

Video | Anti-Inflation Movement | शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने “महागाई विरोधी आंदोलन”
Shivapur toll plaza : पुणेकरांच्या टोल मुक्तीसाठी शहरातील सामाजिक संघटना एकवटल्या
Strike | Old Pension राज्यव्यापी बेमुदत संपास पाठिंबा देण्याकरिता मनपा कर्मचाऱ्यांची निदर्शने !

 प्रभात फेरी व कोपरा सभा घेत महागाईच्या  विरोधात कॉंग्रेस जनजागरण करणार

शहर अध्यक्ष रमेश बागवे यांची महिती

पुणे : केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या महागाईच्या विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत देशात ”जनजागरण अभियान” आयोजित केले आहे. नेहरू स्टेडियम येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुणे शहर जिल्हा  कॉंग्रेस कमिटीच्या वतीने लोकमान्य टिळक पुतळा, मंडई पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस भाववाढीमुळे त्रस्त झालेल्या जनतेचे छायाचित्रांचे फलक घेवून, मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या प्रभात फेरीमध्ये सहभागी झाले. यावेळी शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले कि पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी व कोपरा सभा घेवून या महागाईच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करणार आहोत.

१४ ते  २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आदेश

यावेळी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ”आज भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची १३२ वी जयंती आहे. देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. भाक्रा नांगल धरण प्रकल्प, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, आय.आय.टी., आय.आय.एम., एम्स, हिंदुस्थान अँटी बॉटिक्स, भाभा अटोमिक संशोधन केंद्र, एन.डी.ए. सारख्या संस्थेची स्थापना केली.

     देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी देशाची प्रगती केली त्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतात. आज भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत सामान्य जनतेचे जगणे कठिण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत स्थापन केलेले सरकारी संस्थांचे भाजप सरकार खाजगीकरण करीत आहे, या खाजगी करणाच्या नावाखाली अनेकांची नोकरी संपुष्टात आली आहे. देशात बेरोजगारी वाढत आहे. कॉंग्रेस पक्षाने आंदोलनामार्फत या भाववाढीकडे आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले, परंतु सरकार कानाडोळा करीत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांनी महागार्इच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी दि. १४ ते दि. २९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जनजागरण अभियान राबविण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार आज पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करून प्रभात फेरी काढली. पुढच्या १५ दिवसात पुणे शहराच्या विविध वॉर्डात प्रभात फेरी व कोपरा सभा घेवून या महागार्इच्या विरोधात जनतेमध्ये जनजागरण करणार आहोत.

जनतेच्या हिताकरीता आज कॉंग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जनजागरण करीत आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षाने त्वरीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावे अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.”

यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे यांचीही भाषणे झाली.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, दत्ता बहिरट, वीरेंद्र किराड, अमीर शेख, लता राजगुरू, मनीष आनंद, पुजा आनंद, नीता रजपूत, सोनाली मारणे, प्रकाश पवार, विशाल मलके, भूषण रानभरे, संगिता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, प्रवीण करपे, राजेंद्र भुतडा, सतिश पवार, रमेश सोनकांबळे, रमेश सकट, शिलार रतनगिरी, अमित बागुल, बाळासाहेब अमराळे, प्रशांत सुरसे, किशोर वाघेला, नितीन परतानी, जावेद निलगर, सादिक लुकडे, अनुसया गायकवाड, तार्इ कसबे, मिरा शिंदे, अॅड. राजश्री अडसूळ, ज्योती परदेशी, कल्पना उनवणे, राधिका मखामले, रजिया बल्लारी, संगिता क्षिरसागर, अविनाश अडसूळ, क्लेमेंट लाजरस, राकेश नामेकर, सुरेश कांबळे, भरत सुराणा, बबलू कोळी, गणेश शेडगे, दिलीप लोळगे, अक्षय माने आदींसह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त पुणे शहर जिल्या कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे व माजी आमदार दिप्ती चवधरी यांनी कॉंग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0