… म्हणून माजी मंत्री म्हणू नका असे म्हणालो.!
: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण
पुणे: भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री म्हणू नका, या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. तो उल्लेख एका कार्यक्रमात माझ्यासाठी नव्हता तर स्थानिक नेत्यासाठी होता. मात्र क्लिप वायरल करताना ती चुकीच्या पद्धतीने केली गेली. असे ही सांगत पाटील यांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
: अजित पवार राज्याचे कि पुण्याचे उपमुख्यमंत्री
चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी पुण्यातील कसबा पेठ गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनतर पाटील माध्यमाशी बोलत होते. त्यावेळी पाटील यांनी माजी मंत्री प्रकरणावर पडदा टाकला. काही दिवसांपूर्वी पाटील असे म्हणाले होते कि माजी मंत्री म्हणू नका आगामी दोन तीन दिवसात कळेल माजी आहे का आजी आहे. याबाबत छेडले असता पाटील म्हणाले, उल्लेख एका कार्यक्रमात माझ्यासाठी नव्हता तर स्थानिक नेत्यासाठी होता. मात्र क्लिप वायरल करताना ती चुकीच्या पद्धतीने केली गेली.
पाटील पुढे म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे फक्त पुण्याचे कि राज्याचे हे कळेनासे झाले आहे. कारण कोविड ची फक्त पुण्याची आकडेवारी त्यांना माहित असते. गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात काय चालले आहे, हे पवारांना माहित नाही. त्यांनी याकडे ही लक्ष द्यावे. पाटील यांनी पवारांवर जिएसटी वरून ही टोला लगावला. केंद्र पेट्रोल-डिझेल ला जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तयारीत आहे. मात्र पवारांनी त्याला विरोध केला होता. त्यावर पाटील यांनी पवारांवर निशाणा साधला.
पाटील पुढेम्हणाले की महाविकास आघाडी सरकारने आमचे कितीही नेते पळवण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही. कारण लोकांचे मोदींवर अजून प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडतील.
COMMENTS