Rotating washing’ centre  | पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

HomeBreaking Newsपुणे

Rotating washing’ centre | पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

Ganesh Kumar Mule Jan 26, 2023 1:59 PM

Nagar Road BRTS | Removal of Nagar Road BRT route started | The road was closed for three years
BRTS | MLA Sunil Tingre | नगर रस्त्यावरील बीआरटी काढा अन वाहतुक कोंडी सोडवा | आमदार सुनिल टिंगरे यांची लक्षवेधीतून विधानसभेत मागणी
PMPML | BRTS | पीएमपीने  बीआरटी बसस्थानकामधील सुरक्षारक्षकांची नियुक्ती थांबवली  | आर्थिक कारणास्तव पीएमपीचा धोरणात्मक निर्णय 

पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

|  बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्यासाठी होणार वापर

| फिटर  बाबासाहेब मुलाणी यांच्या कडून ३ दिवसात निर्मिती.

| कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे होणार स्वच्छ.

बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बसथांबे पाण्याने धुवून स्वच्छ करणेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पिंपरी आगारात कार्यरत असलेले बेंच फिटर बाबासाहेब मुलाणी यांनी कल्पना लढवून ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार करून बी.आर.टी. बसथांबे स्वच्छ करणे सोपे केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनेक यांत्रिकी बाबींशी संलग्न काम करणारे कर्मचारी हे कल्पकता लढवून आपल्या परीने कामात सोपेपणा
आणण्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी करत असतात. बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी पिंपरी आगाराचे आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे व पिंपरी आगार अभियंता राजकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब मुलाणी यांनी १ एच.पी.ची मोटर, २ हजार लिटर पाण्याची टाकी व अन्य टाकाऊ साहित्या पासून सर्व्हिस व्हॅन मध्ये ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केले आहे.

एका बी.आर.टी. बसथांब्यावरून दुसऱ्या बसथांब्यावर जाऊन कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे पाण्याने धुवून स्वच्छ करणे शक्‍य होणार असल्याने ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार करण्याबाबत आगार व्यवस्थापक  भास्कर दहातोंडे व आगार अभियंता  राजकुमार माने व  बाबासाहेब मुलाणी यांनी विचार केला, यासाठी पार्ट कोणतेवापरायचे ? त्याची रचना कशी करायची ? याचा अभ्यास करून त्यांनी एक डिझाईन तयार करून पार्ट्स बनवून घेतले व ते सर्व्हिस व्हॅन मध्ये जोडले. सिंगल फेज विजेवर चालणारी मोटार जोडून ३ दिवसांच्या प्रयत्नानंतर हे ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार झाले आहे. एका बी.आर.टी. बसथांब्यावरून दुसऱ्या बसथांब्यावर जाऊन कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे पाण्याने धुवून स्वच्छ करणे सोयीस्कर झाले आहे. ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केल्याबद्दल आगार व्यवस्थापक  भास्कर दहातोंडे, आगार अभियंता राजकुमार माने व फिटर श्री. बाबासाहेब मुलाणी यांचे महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार – पवार यांनी कौतुक केले.