PMPML Bus | उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद लुटण्यासाठी पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

Homeadministrative

PMPML Bus | उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद लुटण्यासाठी पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Apr 09, 2025 7:53 PM

cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी
2000 Rupees Note | RBI | पुणे राष्ट्रवादी च्या वतीने RBI कार्यालयाच्या बाहेर २००० च्या नोटांना श्रद्धांजली 
Chapekar Memorial | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण

PMPML Bus | उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद लुटण्यासाठी पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

PMP Bus Service – (The Karbhari News Service) – पीएमपीएमएल च्या पर्यटन बससेवेला हौशी पर्यटक, भाविक-भक्त तसेच प्रवाशांचा चांगला प्रतिसाद व पसंती मिळत आहे. पीएमपीएमएल ची पर्यटन बससेवा किफायतशीर दरात उपलब्ध असल्याने उन्हाळाच्या सुट्यांमध्ये सहलींचा आनंद पीएमपीएमएल च्या पर्यटन बससेवेसंगे लुटावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करणेत येत आहे.

प्रत्येक आठवड्याच्या शनिवारी व रविवारी विविध कार्यालये, कॉलेज, शाळा, औद्योगिक क्षेत्रातील व आयटी क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकरदारांना साप्ताहिक सुट्टी असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद जास्त असतो. सदरील प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होणेच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता वातानुकूलीत ई-बसेसव्दारे विशेष बससेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी व इतर दिवशी बस सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .

पर्यटन बससेवेचे मार्ग व इतर माहिती खालीलप्रमाणे

पर्यटन बससेवा क्र. १

 मार्ग –  हडपसर गाडीतळ – स्वारगेट – इस्कॉन मंदिर कोंढवा रोड – श्रीक्षेत्र कानिफनाथ गड – मोरगाव गणपती –
दर्शन – जेजुरी दर्शन – सासवड- स्वारगेट- हडपसर गाडीतळ.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:००
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – हडपसर गाडीतळ
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. २

 मार्ग – हडपसर गाडीतळ – स्वारगेट- सासवड ( सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर) नारायणपुर, (एकमुखी दत्त
मंदिर, नारायणेश्वर मंदिर), श्री क्षेत्र म्हस्कोबा मंदिर कोडीत – सासवड – स्वारगेट – हडपसर गाडीतळ.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – हडपसर गाडीतळ
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ३

 मार्ग – पुणेस्टेशन – डेक्कन जिमखाना स्वारगेट – शिवसृष्टी आबेगांव – स्वामी नारायण मंदिर नन्हे-कोंढणपुर
तुकाईमाता मंदिर – बनेश्वर मंदिर, अभय आरण्य – बालाजी मंदिर केतकावळे – स्वांरगेट.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – डेक्कन जिमखाना
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ४

 मार्ग – पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना – पु. ल. देशपांडे गार्डन – खारावडे म्हसोबा देवस्थान – निलकंठेश्वर पायथा –
झपूर्झा संग्रहालय घोटावडे फाटा मार्गे – डेक्कन जिमखाना – पुणे स्टेशन.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ५

 मार्ग – पुणे स्टेशन – डेक्कन जिमखाना सिंहगड रोडने – खडकवासला धरण – सिंहगड पायथा – गोकुळ फ्लॉवर पार्क
गोळेवाडी – पानशेत धरण – डेक्कन जिमखाना – पुणे स्टेशन.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

 पर्यटन बससेवा क्र. ६

 मार्ग – पुणे स्टेशन – स्वारगेट हडपसर रामदरा – थेऊर गणपती – प्रयागधाम हडपसर – स्वारगेट- पुणे स्टेशन.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १७:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ७

 मार्ग – पुणे स्टेशन – स्वारगेट- वाघेश्वर मंदिर (वाघोली) – वाडे बोल्हाई मंदिर – तुळापुर त्रिवेणी संगम छत्रपती
संभाजी महाराज समाधी ( वढु बुा.) – रांजणगाव गणपती मंदिर – भिमा कोरेगांव विजय स्तंभ – पुणे स्टेशन.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ८

 मार्ग – पुणे स्टेशन – स्वारगेट – इस्कॉन मंदिर रावेत – मोरया गोसावी मंदिर चिंचवड – प्रतिशिर्डी शिरगांवदेहुगांव
गाथामंदिर – भंडारा डोंगर पायथा – स्वारगेट- पुणे स्टेशन.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १९:००
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन.
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. ९

 मार्ग – स्वारगेट- पौडगांव – श्री. सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान) – चिन्मय विभूतीयोग साधना
ध्यानकेंद्र कोळवण – स्वारगेट.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन.
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पर्यटन बससेवा क्र. १०

 मार्ग – स्वारगेट- भोसरी – चाकण-क्रांतीवीर हुतात्मा राजगुरू स्मारक – सिध्देश्वर मंदिर राजगुरू नगर – श्री क्षेत्र
खंडोबा मंदिर निमगांव दावडी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळ – श्री गजानन महाराज मठ आळंदी –
स्वारगेट.
 बस सुटण्याची वेळ – ०९:००
 बस पोहोचण्याची वेळ – १८:३०
 बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन.
 प्रति प्रवासी तिकीट दर – रूपये ५००/-

पीएमपीएमएल पर्यटन बससेवेबाबत इतर माहिती खालीलप्रमाणे

1. बसेसच्या आसन क्षमतेनुसार पूर्ण ३३ प्रवाशांचे ग्रुप तिकीट काढल्यास ५ प्रवाशांच्या तिकीट दरामध्ये १०० टक्के सवलत देण्यात येईल .
2. परिवहन महामंडळाकडून सर्व पर्यटन बससेवेचे दर प्रतिव्यक्ती प्रतिमार्गाकरीता रू. ५००/- निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच पर्यटन बससेवेकरीता बुकिंग – १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या पास केंद्रांवरून करण्यात येते.
3. सदरील बससेवेस ज्या दिवशी प्रवाशांचा अल्प प्रतिसाद लाभेल तसेच काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बससेवा रद्द झाल्यास त्या प्रवाशांना इतर दिवशी (त्या पुढील आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी) प्रवास करण्याची मुभा राहील.

4. सदरील बससेवेचे ज्या दिवशी बुकींग केले असेल त्या दिवशी सदर प्रवासास राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत व सायंकाळी पोहचल्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या घरापर्यंत सदरील तिकिटावर अन्य मार्गाच्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा राहील.
5. प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता प्रत्येक बसमध्ये गाईड सेवकाची नेमणूक करण्यात येणार आहे.
6. सदरील पर्यटन बससेवेचे तिकिट बुकिंग व स्थळांसंदर्भातील माहिती करीता पीएमपीएमएल चे समन्वयक सेवक श्री. नितीन गुरव मो.क्र. ९८५०५०१८६२ यांचेशी संपर्क साधावा.
तरी उन्हाळाच्या सुट्यांमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पर्यटन बससेवेचा लाभ निसर्गप्रेमी, पर्यटक व भाविकांनी
घ्यावा असे आवाहन करणेत येत आहे.