PMPML Bus | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात येणार ९०० बसेस
| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती
PMPML Bus | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) ताफ्यात येत्या काही महिन्यांमध्ये ९०० ई-बस (E Bus)दाखल होणार आहेत. त्यामध्ये सात मीटर लांबीच्या ३०० ई-बसेस जी. सी. सी. तत्वावर तसेच संचालक मंडळाने मान्यता दिलेल्या ३०० बसेस व केंद्र सरकारकडून ३०० बसेस अशा एकूण९०० बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील. अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) यांनी गुरूवारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदे मध्ये दिली. (PMPML Bus)
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळा कडील कर्मचारी संघटना, खासगी बस पुरवठादार व सी. एन. जी. पुरवठादार एम.एन.जी.एल. यांच्याप्रलंबित प्रश्नांवर गुरूवारी पुणे
महानगर परिवहन महामंडळाच्या स्वारगेट येथील मुख्य कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीसाठी पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त शेखर सिंग (PCMC Commissioner Shekhar Shing), पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया (PMPML CMD Om Prakash Bakoria), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल (PMRDA Commissioner Rahul Mahiwal) व पीएमपीएमएलच्या सहव्यवस्थापकीय संचालक मा. प्रज्ञा पोतदार-पवार उपस्थित होते. (PMPML Pune News)
बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, की पुणे महानगर परिवहन महामंडळाला चांगली सेवा देण्यासाठी बसची आवश्यकता आहे. मेट्रो सेवा सुरू होईपर्यंत सात मीटरच्या ३०० ई-बस
पीएमपीच्या ताफ्यात येतील. तसेच, केंद्र सरकारच्या योजनेतून पीएमपीला ३०० ई-बसमिळणार आहेत. तसेच, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांच्या माध्यमातून ३०० बसेस महामंडळास मिळणार आहेत. यामध्ये जी. सी. सी. तत्वावर १०० ई-बसेस व२०० सीएनजी बसेस असणार आहेत. तसेच सदर बैठकीमध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळाचे
कर्मचारी, खासगी बस पुरवठादार व सी. एन. जी. पुरवठादार एम.एन.जी.एल.यांच्या प्रलंबित प्रश्नावर समाधानकारक तोडगा निघाल्याचे पाटील यांनी सांगितले.
News Title | PMPML Bus | 900 buses will come in the fleet of Pune Mahanagar Transport Corporation | Guardian Minister Chandrakant Patil informed