PMC Water Supply Department | पाणी प्रश्नांबाबत तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांना उपलब्ध करुन दिला ईमेल आयडी!

Homeadministrative

PMC Water Supply Department | पाणी प्रश्नांबाबत तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांना उपलब्ध करुन दिला ईमेल आयडी!

Ganesh Kumar Mule Nov 07, 2024 9:52 PM

Pune Water cut on Friday | येत्या शुक्रवारी पूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद | शनिवारी कमी दाबाने पाणी
 Emphasis of Pune Municipal corporation (PMC) Water Supply Department on breaking unauthorized taps 
Water cut in Pune on Thursday | येत्या गुरुवारी शहराच्या काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार | जाणून घ्या परिसर

PMC Water Supply Department | पाणी प्रश्नांबाबत तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेने नागरिकांना उपलब्ध करुन दिला ईमेल आयडी!

 

Pune Water Issus- (The Karbhari News Service) – पुणेकर नागरिकाना पाण्याबाबत बऱ्याच तक्रारी असतात. मात्र तक्रार करायची कुठे आणि कशी? याबाबत नागरिक संभ्रमात असतात. मात्र आता तक्रार करणे सोपे होणार आहे. पाण्याबाबत तक्रार करण्यासाठी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ईमेल आयडी उपलब्ध करुन दिला आहे. अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी दिली. (Pune water problem)

वाघोली हौसिंग सोसायटी असोसिएशन व इतर यांनी पुणे व पिंपरी चिंचवड व पी.एम.आर.डी.ए. हद्दीतील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने व त्यामुळे नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत असल्याने पुरेसा पाणीपुरवठा होणेकरिता उच्च न्यायालय, मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली होती. १०/४/२०२३ रोजी या याचिकेवर दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली  आयुक्त, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), पुणे महानगरपालिका व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (मेंबर सेक्रेटरी) यांची समिती नियुक्त करणेत आली आहे. (Pune PMC News)

समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार नागरिकांना पाणी प्रश्नाबाबत तक्रार करणेकरिता ई-मेल आयडी उपलब्ध करुन द्यावा, असे सूचित करण्यात आले. या निर्णयाच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने waterpil126@punecorporation.org हा ई-मेल आयडी पाणीप्रश्नाबाबत तक्रार करणेकरिता सध्याचे तक्रार नोंदणी सुविधेसह नागरिकांना उपलब्ध करुन दिला आहे. अशी माहिती नंदकिशोर जगताप)मुख्य अभियंता (पाणीपुरवठा), पुणे महानगरपालिका यांनी दिली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0