PMC Water Supply Department | नळजोड बंद करण्याबाबतच्या फसवणूक करणाऱ्या मेसेजना फसू नका | पाणीपुरवठा विभागाचे आवाहन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation – PMC) थकबाकीदार मीटरजोड थकबाकी बील न भरल्यास त्यांचे नळजोड (Water Tap Connection) बंद करण्यात येतील. याबाबतचे मेसेज फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांकडून काही नागरिकांना दरम्यान प्राप्त झालेले आहेत. अशी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे माहिती प्राप्त झालेली आहे. मात्र अशा मेसेज ना फसू नका, असे आवाहन मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांच्या कडून करण्यात आले आहे. (Pune PMC News)
हे संदेश (मेसेज) पाणीपुरवठा विभाग, पुणे महानगरपालिका यांचेकडून नागरिकांना पाठविण्यात आलेले नाहीत. तरी, याबाबत नागरिकांनी अनोळखी मोबाईल क्रमांक व व्यक्ती यांचेसोबत कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन व्यवहार करू नयेत अथवा त्यांना पाठविलेल्या लिंकशी कनेक्ट होऊ नये. या अनुषंगाने पुणे महानगरपालिका मीटर विभागाकडील मीटर बिलावर नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेचा दुरस्थ सहाय्यक (Virtual Assistant) Whatsapp Chatbot No. 8888251001 किंवा http://watertax.punecorporation.org याद्वारे मीटर बिलाची संपूर्ण माहिती व ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच बरोबर अधिक माहितीसाठी पुणे महानगरपालिका कॉल सेंटर क्र. 1800103222 वर किंवा संबंधित मीटर रीडरकडे संपर्क साधावा. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
COMMENTS