PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर

खडकवासला धरण.

Homeadministrative

PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर

Ganesh Kumar Mule Aug 07, 2024 10:36 AM

Water Distribution planning | उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनासाठी महापालिका आणि जलसंपदा खात्याची उद्या बैठक
Recruitment | जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ  अभियंत्यांच्या ५०० पदांची भरती | पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती 
Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 

PMC Water Budget 2024-25 | पुणे महापालिकेचे २०२४-२५ साठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाला सादर

 
PMC Water Budget- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) २०२४-२५ सालसाठी २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक (Water Budget) जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) सादर केले आहे. पुणे शहराची (Pune City) समाविष्ट गावासहित ७९ लाख ३९ हजार लोकसंख्या गृहीत धरून हे अंदाजपत्रक सादर केले आहे. मागील वर्षी महापालिकेने २०.९० टीएमसी पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र जलसंपदा विभागाने १२.८२ टीएमसी पाणी मंजूर केले होते. यावर्षी जलसंपदा किती पाण्याचा कोटा मंजूर करणार, याकडे महापालिकेचे डोळे लागून राहिले आहेत. (Pune PMC News)
महापालिकेच्या प्रस्तावानुसार सन २०१९ मध्ये पुणे महानगरपालिकेकडून आधार नोंदणी व इतर साधनांव्दारे माहिती संकलीत करण्यात आली असून पुणे शहराची लोकसंख्या एकूण ५२,०८,४४४ इतकी निश्चित झाली होती. २०२३-२४ च्या पाण्याच्या अंदाजपत्रकामध्ये सन २०१९ च्या जुन्या हद्दीमध्ये लोकसंख्येमध्ये प्रति वर्ष वार्षिक २% वाढ गृहीत धरण्यात आली होती. पुणे महानगरपालिके मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ११ गावांची लोकसंख्या (२९८७१४) तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांची लोकसंख्या (८१६०००) गृहीत धरण्यात आली होती. तसेच एकूण लोकसंख्येवर ५% तरंगती लोकसंख्या गृहीत धरून ७२,८१,०३२ इतक्या लोकसंख्येसाठी व ३५ % पाणी गळतीसह  महापालिका आयुक्त यांचे स्वाक्षरीसह सन २०२३ – २०२४ साठी एकूण २०.९० TMC एवढे पाण्याचे अंदाजपत्रक देण्यात आले होते.


पुणे मनपामध्ये नव्याने समाविष्ट ३४ गावांपैकी धायरी, नांदेड, नांदोशी, कोंढवे-धावडे, आंबेगाव खु., उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा केशवनगर व मांजरी या गावांमध्ये नजीकच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विषयक नेटवर्कची कामे करण्यात आली’
आहेत. तसेच या बहुतांशी भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था मुद्धा उपलब्ध आहे. पाण्याचे अंदाजपत्रक मध्ये दर्शविल्यानुसार ३४ गावांची मागील जनवर्षातील लोकसंख्या ११.१४.७१४ मध्ये २% वाढ केल्यास सदरची लोकसंख्या ११.३०.००८ एवढी येत आहे. तथापि या भागामध्ये इतर प्रकल्पीय कामांसाठी केलेल्या विस्तृत अभ्यासानुसार व सर्वसाधारण तकारी व पाण्याची मागणी वाचा विचार करता मध्याची
अंदाजित लोकसंख्या ही त्यापेक्षा जादा असल्याचे दिसून येते.
 ३४ गावांच्या लोकसंख्येचा अंदाज बांधण्यासाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार सल्ल्गारांमार्फत सखोल अभ्यास करण्यात आला आहे. त्यामध्ये Mathematical calculations for projections, Urban Growth Differential (URGD), Density method, Logistical Curving method, Density mapping method इ. कार्यपद्धतीनुसार सल्ल्गारांमार्फत त्याचा विस्तृत अहवाल तयार केला असून त्यानुसार ३४ गावांची एकूण लोकसंख्या सन २०२४-२५ करिता १८,११,३४० एवढी येत आहे.
 त्यानुसार नव्याने समाविष्ट ३४ गावांपैकी धायरी, नांदेड, नांदोशी, कोंडवे – धावडे, आंबेगाव खु., उरुळी देवाची, फुरसुंगी, मुंढवा केशवनगर व मांजरी या गावांची
लोकसंख्या ८,००,३१३ येत आहे. या भागासाठी बसविण्यात आलेल्या बल्क मीटर नुसार सरासरी १२० लि. प्रतीमाणसी इतके पाणीपुरवठा करणेत येत आहे.
वरील गावांव्यतिरिक्त उर्वरित गावांसाठी अंदाजित लोकसंख्या १०,११,०२६ असून या भागासाठी टेंकर व अल्प प्रमाणात विकसित असलेल्या पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या गावांसाठी ७० LPCD प्रमाणे मागणी करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये बिगर घरगुती (Commercial) पाणीवापर हा १५० LPCD चे
व्यतिरिक्त असल्याने त्याचे प्रत्यक्ष वापराची (सन २०२३-२४) यादी तयार करून पाटबंधारे विभागास सादर केलेली आहे. त्यानुसार पाणीवापर हा या वर्षीसाठी २% वाढ धरून २५.९८ MLD आहे. MWRRA ऑर्डर नुसार  For Distribution of Surface Water Entitlements By River Basin Agencies For Domestic & Industrial Uses अनुज्ञेय असलेले कोणतेही प्रोसेस इंडस्ट्रीज करिता महापालिकेद्वारे पाणी पुरविले जात नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेचा इंडस्ट्रीयल (औद्योगिक पाणीवापर ०.०० घ.मी. आहे. असे महापालिकेने म्हटले आहे.
 

पुणे महानगरपालिकेचे जुने हद्दीमध्ये व नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये ३५% पाणीगळती गृहीत धरली आहे. पुणे शहरामध्ये जुन्या हद्दीमध्ये समान पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यात येत असून १४१ झोन पैकी ५० झोनची कामे पूर्ण झालेली आहेत. सदर ५० झोन मध्ये गळती शोधणे व त्याचे दुरुस्ती करणेची कामे सुरु करण्यात आलेली आहेत. तसेच पाणी वितरणामध्ये सुसूत्रता आल्याने काही अत्यल्प पाणीपुरवठा होत असलेल्या भागामध्ये उदा. बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागातील पाणीपुरवठ्यामध्ये वाढ झालेली आहे. तसेच पुणे मनपा हद्दीलगतच्या नव्याने समाविष्ट गावांमधील वितरण व्यवस्थे मध्ये वाढ करून त्यांचे पाणीपुरवठ्यामध्ये वाढ केलेली आहे. तसेच नव्याने समाविष्ट गावासाठी टैंकर संख्येमध्ये देखील सुमारे ४०% ने वाढ केलीली आहे.
 
सन २०२२-२३ या जलवर्षामध्ये पुणे शहराचा पाणीवापर हा २१.०१ TMC होता. वरीलप्रमाणे काही भागामध्ये पाणीपुरवठा वाढ करून देखील सन २०२३-२४ चे जलवर्षातील पाण्याचा वापर २१.१८ TMC आहे. पाणीपुरवठ्याचा भाग वाढवून देखील
मागील वर्षांचे तुलनेत पाणी वापरामध्ये अत्यल्प वाढ झालेली आहे. या  बाबींच्या अनुषंगाने सन २०२४-२५ वर्षासाठी आवश्यक २१.४८ TMC पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले आहे.  सादर केलेल्या जुलै २०२४ ते जून २०२५ चे वार्षिक पाण्याच्या अंदाजपत्रकानुसार पुणे शहराचा पाणी कोटा मान्य करण्यात यावा व त्याप्रमाणे पाणी देयके देण्यात यावीत. अशी विनंती महापालिकेने केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0