PMC Ward Offices | पुणे महापालिकेची क्षेत्रीय कार्यालये बृहन्मुंबई महापालिकेच्या धर्तीवर केली जाणार सशक्त | महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांची समिती केली स्थापन
Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आता क्षेत्रिय कार्यालय स्तरावर बळकटी आणण्याचा निर्धार केला आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता क्षेत्रिय कार्यालयांवर कामाचा ताण येत आहे या करीता समिती स्थापन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली ८ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा अभ्यास करून पुणे मनपाची क्षेत्रीय कार्यालये बळकट करण्याबाबत अहवाल देणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे शहराच्या कार्यक्षेत्राचा विचार करता व पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांमुळे पुणे महानगरपालिकेला विकास कामे व सदर ठिकाणी सुविधा पुरवणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेचे ५०२ चौरस किलोमीटर कार्यक्षेत्र आहे. तसेच पुणे शहराची वाढती लोकसंख्येचा विचार करता सदर ठिकाणी सोयी सुविधा पुरविणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे क्षेत्रिय कार्यालयांवर कामाचा ताण येत आहे. पुणे महानगरपालिकेचे विविध क्षेत्रिय कार्यालये बळकटीकरण करून तेथील समस्याचा निवारण करून व प्राप्त होणाऱ्या तक्रारी ह्या क्षेत्रिय स्तरावर सोडविण्याच्या दृष्टीने व तक्रारी कमी करण्यास उपाय योजना आखण्याकरिता समिती स्थापन करण्यात आली आहे.
-
समिती १५ दिवसात देणार अहवाल
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आपल्या आदेशांत म्हटले आहे कि या समितीने बृहन्मुंबई महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाचा अभ्यास करून कशा प्रकारे आपली क्षेत्रीय कार्यालये बळकट होतील, याचा अभ्यास करायचा आहे, तसेच नागरिकांना समाधानकारक सोयीसुविधा आणि त्या परिसरात विकास काम करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याचा अभ्यास करायचा आहे. तसेच याचा अहवाल १५ दिवसात सादर करायचा आहे, असे आयुक्तांनी म्हटले आहे.
-
समितीत हे असतील अधिकारी
१) एम. जे. प्रदीप चंद्रन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) – अध्यक्ष
२) पृथ्वीराज बी.पी., अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) – निमंत्रित सदस्य
३) ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) -निमंत्रित सदस्य
४) प्रशांत वाघमारे, शहर अभियंता – सदस्य
५) उल्का कळसकर, सह महापालिका आयुक्त तथा मुख्य लेखा व सदस्य वित्त अधिकारी
६) माधव जगताप, उप आयुक्त परिमंडळ क्र. १ – सदस्य
७) सुरेखा भणगे, सहाय्यक आयुक्त धनकवडी क्षेत्रिय कार्यालय – सदस्य
८ प्रसाद काटकर, उप आयुक्त, सामान्य प्रशासन विभाग – सदस्य सचिव

COMMENTS