PMC Ward 3 Vimannagar Lohgaon | विमाननगर – लोहगाव | प्रभागाची व्याप्ती, हद्द, कशा पद्धतीने बनलाय प्रभाग जाणून घ्या सविस्तर
Pune PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – विमाननगर लोहगाव हा महापालिकेचा तिसऱ्या क्रमांकाचा प्रभाग. हा प्रभाग देखील बराच मोठा झाला आहे. पूर्व पुण्यातील बरेचसे भाग या प्रभागात येत आहेत. त्यामुळे इथे काम करायला देखील बराच वाव आहे. मात्र सगळ्या लोकांपर्यंत नगरसेवक पोहोचू शकणार का, हा प्रश्न मात्र उरतोच आहे. चला या प्रभागाची व्याप्ती जाणून घेऊया. (PMC Election 2025)
प्रभाग क्रमांक ३ – विमाननगर – लोहगाव
लोकसंख्या – एकूण ९२४१० – अ. जा. १००८२ – अ. ज. १०१७
निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या – ४
व्याप्तीः लोहगाव गुरुद्वारा परिसर, लोहगांव विमानतळ, विमाननगर, फिनीक्स मॉल, एअर फोर्स कॅम्पस पुरु सोसायटी, संजय पार्क, गंगा हॅम्लेट, इन-ऑरबीट मॉल, सोमनाथ नगर, क्लोव्हर पार्क, प्राईड रिजेन्सी, रोहन मिथिला सोसायटी, बॉम्बे सेपर्स कॉलनी, सुनिता नगर, करण आशियाना, वाघोली रोहन अभिलाशा टाऊनशिप, भैरवनाथ तलाव परिसर, श्री राम लोट्स सोसायटी, माथाडे वस्ती, संत नगर, साईधाम कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, पूर्वरंग सोसायटी इ.
उत्तर: टिंगरेनगर गल्ली क्र. १४ चा रस्ता धानोरी टिंगरेनगर मधील नाल्यास जिथे मिळतो तेथून उत्तरेस सदर नाल्याने कलवड वस्तीमधील स्टार अपार्टमेंटच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने कलवड वस्तीमधील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने विश्रांतवाडी लोहगाव रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तर पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे लोहगाव वडगाव शिंदे रस्त्याने माथाडे वस्तीमधील श्रीराम लोटस सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस पुढे दक्षिणेस श्रीराम लोटस सोसायटीच्या पूर्वेकडील हद्दीने लोहगाव मधील जुना वॉर्ड नं. २ ची दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने संत तुकाराम मंदिराजवळ मौजे आळी वडगाव रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने वडगाव शिंदे रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस व पुढे उत्तरेस वडगाव शिंदे रस्त्याने मौजे लोहगाव व मौजे वडगाव शिंदे यांच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने इंद्रायणी नदीस मिळेपर्यंत.
पूर्वः मौजे लोहगाव व मौजे वडगाव शिंदे यांची हद्द जेथे इंद्रायणी नदीस मिळते तेथून दक्षिणपूर्वेस इंद्रायणी नदीने मौजे लोहगाव व मौजे भावडीच्या हद्दीस मिळेपर्यत तेथून दक्षिणेस सदर हद्दीने मौजे वाघोली व मौजे भावडीच्या हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने मौजे वाघोली व मौजे लोणीकंद यांचे हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर हद्दीने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने सिद्धार्थनगर गल्ली क्र. ३ ला मिळेपर्यत.
दक्षिण: पुणे अहिल्यानगर रस्ता सिद्धार्थनगर गल्ली क्र. ३ ला जेथे मिळतो तेथून उत्तरेस सदर रस्त्याने सुखवानी पाम्स सोसायटीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने वाघोली गावठाणाच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने (अमृतनगरी सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्द) भैरवनाथ तळ्याच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यत तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस वाघोली भावडी रस्त्याने लोहगाव वाघोली रस्ता ओलांडून पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने व पुढे मौजे खराडी व मौजे लोहगावच्या हद्दीने खराडीमधील फ़ाऊंटन रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने लोहगांव स.नं. १२७ च्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस एअर फोर्सच्या हद्दीस मिळेपर्यत तेथून पश्चिमेस व पुढे दक्षिणेस एअर फोर्सच्या हद्दीने पुणे अहिल्यानगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने वडगांवशेरी खराडी हद्दीवरील हरिभाऊ गलांडे रस्त्यास मिळेपर्यत तेथून दक्षिणेस हरीभाऊ गलांडे पथाने गणेश नगर रस्त्यास ( स. नं. ४७ / ३ वडगांवशेरी च्या दक्षिणेकडील रस्ता) मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस गणेशनगर रस्त्याने स्वामी समर्थ मंदिराजवळील चौक ओलांडून पुढे दत्तप्रसाद सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्याने अशोक सुपर मार्केटसमोरील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर दक्षिणोत्तर रस्त्याने ग्रेवाल हौसिंग सोसायटीच्या पश्चिमेकडील सोमनाथनगर लेन क्र. २ ला मिळेपर्यंत (पार्वती इमारतीच्या दक्षिणेकडील रस्ता) तेथून पश्चिमेस सदर लेन क्र.२ ने व पुढे मोरया पार्क सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्याने सोमनाथनगर मधील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने रामचंद्र खंडूजी गलांडे पथास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस रामचंद्र खंडूजी गलांडे पथाने सोपाननगरच्या पश्चिमेकडील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सोपाननगरच्या पश्चिमेकडील दक्षिणोत्तर रस्त्याने पुणे नगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस पुणे अहिल्यानगर रस्त्याने रामवाडी चौकात डंकर्क लाईनच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यत.
पश्चिमः पुणे अहिल्यानगर रस्ता रामवाडी चौकात डंकर्क लाईनच्या पश्चिमेकडील हद्दीस जिथे मिळतो तेथून उत्तरेस डंकर्क लाईनच्या पूर्वेकडील हद्दीने संजय पार्क मधील झोपडपट्टीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यत तेथून सदर हद्दीने नवीन एअर पोर्ट हद्दीस मिळेपर्यत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने विमाननगर पार्किंग च्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने अमीर चिकन शॉपच्या पूर्वेकडील गल्ल्लीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस संजय पार्क लेन नं. ५ ला मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस लेन ५ ने संजय पार्क लेन नं. ५ डी च्या रस्त्यास मिळेपर्यत, तेथून दक्षिणेस डंकर्क लाईनच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यत तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस संजय पार्क रस्त्याने नॅशनल गेम रस्त्यास मिळेपर्यत पुढे उत्तरेस सदर रस्त्याने ५०९ चौकात विश्रांतवाडी लोहगांव रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस विश्रांतवाडी लोहगांव रस्त्याने टिंगरेनगर गल्ली क्र. १४ च्या रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस गल्ली क्र. १४ च्या रस्त्याने धानोरी टिंगरेनगर मधील नाल्यास मिळेपर्यंत.

COMMENTS