PMC Ward 17 – Ramtekadi Malwadi | प्रभाग क्रमांक १७ –  रामटेकडी- माळवाडी | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 17 – Ramtekadi Malwadi | प्रभाग क्रमांक १७ –  रामटेकडी- माळवाडी | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 02, 2025 9:01 PM

PMC Election | अनामत रक्कम परत घेण्याचे महापालिकेचे आवाहन | ऑनलाईन  प्रणाली द्वारे दिली जाणार रक्कम 
State Election Commission | शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही – राज्य निवडणूक आयोग
Water Closure | शनिवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

PMC Ward 17 – Ramtekadi Malwadi | प्रभाग क्रमांक १७ –  रामटेकडी- माळवाडी | प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

 

Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – रामटेकडी माळवाडी हा प्रभाग रामटेकडी पासून ते मगरपट्टा सिटी पर्यंत पसरलेला आहे. प्रभागात अनुसूचित जातीची लोकसंख्या १९ हजार ७ इतकी आहे.  या प्रभागाची सविस्तर रचना जाणून घेऊया. (Pune PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक १७ –  रामटेकडी- माळवाडी

लोकसंख्या एकूण – ९२६६५ – अ. जा. १९०७० – अ.ज. ११९०

निवडून  द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: रामटेकडी. रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया वैदुवाडी, सुंदर संकुल हेलीकोनीया अपार्टमेंट, ग्रीन पार्क, भोसले नगर, लक्ष्मी विहार, माळवाडी, गाडीतळ, साधना सोसायटी, इंद्रप्रस्थ सोसायटी, मगरपट्टा सिटी (पार्ट), आकाशवाणी इ.

उत्तर: जुना मुठा कालव्याच्या पूर्वेकडील रस्ता (सुधासुमन सोसायटीच्या पूर्वेकडील रस्ता) हेलीकोनिया सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास जेथे मिळतो तेथून पूर्वेस सदर रस्त्याने ग्रेवेलीया सोसायटी च्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने सायबर सिटी टॉवर क्र. १६ च्या दक्षिणेकडील रस्त्यास व पुढे पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे उत्तरेस सायबर सिटी टॉवर क्र. २ च्या पूर्वेकडील रस्त्याने डॅफोडील्स सोसायटीच्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने, थीमड गार्डन चौक ओलांडून पुढे पूर्वेस (ACAACIA गार्डन बंगला नं. ३८ च्या दक्षिणेकडील हद्द) सदर रस्त्याने मगरपट्टा मुंढवा रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने कल्याण ज्वेलर्स (कुमार प्लॅनेट) च्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने मौजे हडपसर, मौजे साडेसतरा नळी या हद्दीवरील नाल्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर नाल्याने व पुढे पूर्वेस मौजे साडेसतरा नळी व मौजे हडपसर यांच्या हद्दीने जुना मुठा कालव्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस जुना मुठा कालव्याने मौजे साडेसतरा नळी व मौजे हडपसर यांच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने व पुढे मौजे हडपसर व मौजे मांजरी बुद्रुक यांचे हद्दीने जुना मुठा कालव्यास मिळेपर्यंत. (अमरसृष्टीच्या पश्चिमेकडील कालवा)

पूर्व :  हडपसर व मौजे मांजरी बुद्रुक यांची हद्द जुना मुठा कालव्यास जेथे मिळते (अमरसृष्टीच्या पश्चिमेकडील कालवा ) तेथून दक्षिणेस जुना मुठा कालव्याने पुणे सोलापूर रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिणः जुना मुठा कालवा पुणे सोलापूर रस्त्यास जेथे मिळतो तेथून पश्चिमेस पुणे सोलापूर रस्त्याने वैभव मल्टीप्लेक्सच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर हद्दीने सम्राट गार्डनच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने राम मनोहर लोहिया उद्यानाच्या पूर्वेकडील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर नाल्याने पुणे मिरज रेल्वे लाईनला मिळेपर्यंत तेथून दक्षिण पूर्वेस पुणे मिरज रेल्वे लाईनने ससाणे नगर रस्त्यास ( पंचरत्न, पितृछाया या इमारतीच्या उत्तरेकडील रस्ता) मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने सय्यद नगरच्या पूर्वे कडील नाल्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर नाल्याने मौजे हडपसर व मौजे महंमदवाडी यांचे हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेससदर हद्दीने मौजे हडपसर व मौजे वानवडी यांचे हद्दीस मिळेपर्यंत.

पश्चिमः मौजे हडपसर व मौजे महंमदवाडी यांची हद्द मौजे हडपसर व मौजे वानवडी यांचे हद्दीस जेथे मिळते तेथून उत्तरेस हडपसर- वानवडी हद्दीने व पुढे AIPT च्या पूर्वेकडील रस्त्याने पुणे सोलापूर रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस पुणे सोलापूर रस्त्याने पुणे मिरज रेल्वे लाईन ओलांडून जुन्या मुठा कालव्या शेजारील रस्त्यास (मेगा सेंटर जवळ) मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने (सुधासुमन सोसायटीच्या पूर्वेकडील रस्ता) हेलीकोनिया सोसायटी च्या उत्तरेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.

The Karbhari - Pune PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: