PMC Swachha Bharat Divas | महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने स्वच्छ भारत दिवस साजरा!

Homeadministrative

PMC Swachha Bharat Divas | महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने स्वच्छ भारत दिवस साजरा!

Ganesh Kumar Mule Oct 02, 2025 3:02 PM

Distribution of petrol | दुचाकीस्वारांना रुपये कमी दराने पेट्रोल वाटप | ऍड स्वप्निल जोशी यांच्याकडून कार्यक्रमाचे आयोजन
Kondhwa Road tender | कोंढवा रोड ची निविदा देखील वादाच्या भोवऱ्यात
Pune city is now 5 stars! |Another honour in the veins of (PMC)

PMC Swachha Bharat Divas | महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने स्वच्छ भारत दिवस साजरा!

Mahatma Gandhi Jayanti – (The Karbhari News Service) – राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी ०२ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार आज महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.  (PMC Solid Waste Management Department)

महापालिका आयुक्त यांचे मार्गदर्शनानुसार स्वच्छता ही सेवा २०२५ अभियान अंतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर  या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत एकूण ८४ क्रॉनिक स्पॉट (CTUs) चे सुशोभिकरण करण्यात आले व यासाठी एकूण ५४९० सहभागींनी योगदान दिले. तसेच स्वच्छ फूड स्ट्रीट, शून्य कचरा अभियान, स्वच्छोत्सबसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व बेस्ट टू वंडर उपक्रम असे स्वच्छतेचे विविध ३५ उपक्रम क्षेत्रिय कार्यालयांमार्फत आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये ६५, ३२० नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छ हरित उत्सव अंतर्गत एकूण ३३२ ठिकाणी डीप क्लिन ड्राईव्ह आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये ३२, ३०० नागरिक व अधिकारी/कर्मचारी यांनी सहभाग घेतला. सफाई मित्र सुरक्षा अभियान अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन, PPE कीट वाटप व सफाई कर्मचा-यांना विविध सामाजिक योजनांचा लाभ असे एकूण २१९ उपक्रम घेण्यात आले असून यामध्ये ५, २६७ व्यक्तींनी सहभाग घेतला. अशा प्रकारे स्वच्छता ही सेवा २०२५ अंतर्गत एकूण ७७१ उपक्रम घेण्यात आले असून यामध्ये १,०८, ३७७ नागरिक व अधिकारी / कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

आज  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीनिमित्त स. ८.३० वाजता पांचाळेश्वर मंदिर नदीपात्र, डेक्कन याठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी  मुरलीधर मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री सहकार, नागरी विमान वाहतूक, भारत सरकार, पृथ्वीराज बी.पी. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ),  संदिप कदम, मा. उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन,  संतोष वारुळे, उपायुक्त, परिमंडळ कार्यालय क्र. २, विविध क्षेत्रिय कार्यालयाकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी इ. उपस्थित होते. या स्वच्छता अभियाना दरम्यान एकूण १९.३५ टन कचरा संकलित करण्यात आला.

स्वच्छता ही सेवा २०२५ उपक्रमाचा सांगता समारंभआज रोजी पंडित जवाहरलाल नेहरू हॉल, घोलेरोड (art gallery) याठिकाणी स. ९.३० वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत सर्व क्षेत्रिय कार्यालयांमार्फत अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व त्याचे परिवर्तन (Transformation of Cleanliness Target Units (CTU), सार्वजनिक जागांची स्वच्छता (Clean Public Spaces), सफाई मित्र सुरक्षा शिवीर (Safai Mitra Suraksha Shivirs), स्वच्छ हरित महोत्सव (Clean Green Utsav), स्वच्छता पुरस्कार ( Advocacy For Swachhata) या मुद्द्द्यांचे अनुषंगाने स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिली.

यानंतर स्वच्छ सर्वेक्षण २०२४, गणेशोत्सव २०२५, पालखी सोहळा व स्वच्छता ही सेवा २०२५ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्यास्तव सर्व क्षेत्रिय कार्यालयांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्वच्छता ही सेवा २०२५ उपक्रमांतर्गत पुणे महानगरपालिकेस सहकार्य करणा- या स्वयंसेवी संस्थांचे देखील सत्कार करण्यात आले. यामध्ये यार्दी, CEAR, जनवाणी, Eco exist, E&Y, स्वच्छ, आदर पुनावाला, अॅपेक्स कमिटी, नानासाहेब धर्माधिकारी, आम्रपाली चव्हाण, कमिन्स इंडीया, गौतमी पांडे, रोटरी District 3131 यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  मुरलीधर मोहोळ यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या यशस्वी कामगिरीबाबत पुणे महानगरपालिका व सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे कौतुक केले. तसेच शहराची स्वच्छता टिकविण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्पर्धात्मक भावना निर्माण होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. याकरीता सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्वच्छता विषयक स्पर्धांचे आयोजन करून उत्कृष्ट क्षेत्रिय कार्यालये, उत्कृष्ट वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व उत्कृष्ट आरोग्य निरीक्षक या गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करावे असे त्यांनी सूचित केले.


उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर तसेच अधिकारी/ कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले.

स्वच्छ सर्वेक्षणचे ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर श्री. विक्रांत सिंग यांनी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाबाबत थोडक्यात माहिती दिली व अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यासाठी विविध शाळा / महाविद्यालयीन विद्यार्थी व संस्था इच्छुक असून पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी करू अशी ग्वाही दिली. यानंतर कावेरी इंटरनशनल स्कूलच्या विद्यार्थ्याने हे स्वच्छता के दूत हे स्वच्छता गीत सादर केले व एस. एन. डी. टी. कॉलेजच्या विद्यार्थ्यांमार्फत सार्वजनिक स्वच्छतेच्या अनुषंगाने पथनाट्य सादर करून कार्यक्रम संपन्न झाला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: